खोटं बोलण्यात पटाईत आहे अमिताभ बच्चनची नात नव्य...

खोटं बोलण्यात पटाईत आहे अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली, आजी जया बच्चनने केली कागाळी (Amitabh Bachchan’s granddaughter Navya Naveli is the top in telling lies, Nani Jaya Bachchan was exposed Her like This)

महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने करीअरसाठी अभिनयाची निवड न करता व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. अगदी लहान वयातच ती एक बिझनेस वुमन बनली आहे. व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासोबतच, नव्या आपल्या ‘व्हॉट दे हेल नव्या’ या पॉडकास्टसाठी देखील सतत चर्चेत असते. नव्याच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून चाहत्यांना बच्चन कुटुंबाशी संबंधित अनेक माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेता येतात.

मध्यंतरी तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन यांनी पॉडकास्टमध्ये हजेरी लावलेली. तेव्हा श्वेता आणि जया बच्चन यांनी नव्याबद्दल अनेक खुलासे केले. या पॉडकास्टमुळे सत्यवचनी अमिताभ बच्चन यांची नात खोटं बोलते हे सर्वांना समजले. याबाबतचा खुलासा स्वत: जया बच्चन यांनी केला व त्यांनी नव्याला रंगेहात पकडल्याचे देखील सांगितले.

‘व्हॉट द हेल नव्या’च्या तिसऱ्या पर्वात श्वेता बच्चन आणि जया बच्चन यांनी नव्याशी संबंधित एक धक्कादायक खुलासा करताना म्हटले की, ती खूप खोटं बोलते, पण नव्या खोटं बोलण्यात इतकी कच्ची आहे की ती प्रत्येक वेळी रंगेहात पकडली जाते. जया बच्चन यांनी सांगितले की, मी अनेकदा नव्याचे खोटे पकडले आहे.

 जया बच्चन यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी नव्या आणि तिचा भाऊ अगस्त्य ख्रिसमस पार्टीसाठी बाहेर गेले होते, तेव्हा घरच्यांनी त्यांना ठराविक वेळेत परत येण्याची तंबी दिली होती. मात्र ते वेळेत घरी परतले नाहीत. त्यामुळे श्वेताने नव्याला फोन करुन घरी यायला किती वेळ लागेल ते विचारले.

तेव्हा नव्या म्हणाली आम्ही आलो आहोत. घराजवळच आहोत. तेव्हा आपली मुलगी खोटं बोलतेय हे समजताच श्वेता नव्याला खूप ओरडली. तुला आई म्हणजे कोण वाटते…तुम्ही अजून पार्टीतच आहात हे मला समजत नाही असं वाटतं का ?

नव्याशी संबंधित एक किस्सा शेअर करताना जया बच्चन म्हणाल्या की, एकदा नव्या घराबाहेर गेली होती. मुलं घरी येईपर्यंत मला झोप येत नाही. त्यामुळे नव्याची वाट पाहत मी जागीच होती, बऱ्यापैकी अंधार झाला होता, पण नव्या घरी पोहोचली नव्हती. म्हणून मी नव्याला फोन करून तू कुठे आहे असे विचारले तेव्हा तिने मी माझ्या खोलीत असून कधीचीच घरी परतली आहे असे म्हणाली. जेव्हा मी तिच्या खोलीत गेली तेव्हा ती रिकामी होती. नव्या तिथे नव्हतीच. त्यानंतर थोड्या वेळाने मला ती दबक्या पावलाने घरात येताना दिसली आणि मी तिचे खोटे पकडले होते.