आपल्या सहस्त्रचंद्रदर्शनानिमित्त मिळालेल्या शुभ...

आपल्या सहस्त्रचंद्रदर्शनानिमित्त मिळालेल्या शुभेच्छांबाबत अमिताभ बच्चनचे आभार प्रदर्शन : चाहत्यांना दिला भावुक संदेश (Amitabh Bachchan Written A Heartfelt Gratitude Note To His Fans For Sending Him Their Warm Wishes On His 80th Birthday)

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा ८० वा वाढदिवस काल साजरा झाला. त्या निमित्त बॉलिवूडचे मान्यवर कलावंत आणि चाहते यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यावर बिग बी यांनी चाहत्यांसाठी भावुक संदेश जारी केला आहे.

सोशल मीडियावरून मिळालेल्या शुभेच्छांबाबत अमितजींनी आपल्या भावना ब्लॉगवर व्यक्त केल्या आहेत.

आपल्या या अधिकृत ब्लॉगवर त्यांनी चाहत्यांनी केलेल्या प्रेमाच्या वर्षावावर धन्यवाद दिले आहेत.

त्यांनी या ब्लॉगवर लिहिले, “आणखी एक ३६५… आणखी एक सुरुवात… आणखी नवी सुरुवात करतेवेळी सुरुवातीची गरज असते… अखेरीस प्रेम, केअर आणि ग्रेस यांची गरज असते.”

चाहत्यांच्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असं म्हणून ते लिहितात, “मी हात जोडून तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करतो…”

आपल्या लाडक्या महानायकाची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते काल त्याच्या जलसा बंगल्याबाहेर उभे होते. तेव्हा रात्री त्यांनी बंगल्याबाहेर येऊन हसतमुखाने चाहत्यांना अभिवादन केले.