अमिताभ बच्चन यांनी आपल्या लाडक्या मुलीला श्वेता...

अमिताभ बच्चन यांनी आपल्या लाडक्या मुलीला श्वेता बच्चनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ! (Amitabh Bachchan Wishes Daughter Shweta Bachchan On Her Birthday, Big B Thanks Fans For Wishing His Daughter On Her Birthday)

महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनचा आज वाढदिवस आहे. अमिताभजी आपल्या मुलीच्या बाबत किती हळवे आहेत हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे आजचा दिवस हा श्वेतापेक्षाही अमिताभजींच्या जीवनातील महत्त्वाचा दिवस आहे, म्हणूनच त्यांनी आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत, शिवाय आपल्या मुलीसाठी संदेश लिहिला आहे.
श्वेताचे बालपणीचे फोटो शेअर करून अमिताभजींनी आपल्या मुलीला दिला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बिग बींनी आपल्या लाडक्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचे लहानपणीचे काही फोटो सोशल मीडियावर तसेच आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत श्वेताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

फॅन्सनी श्वेता बच्चनचा जन्मदिवस लक्षात ठेवून ट्वीटरवर तिचे फोटो शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चाहत्यांचे हे प्रेम पाहून हळव्या झालेल्या बिग बींनी सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. शिवाय चाहत्यांच्या पोस्ट त्यांनी रीट्वीट केल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी श्वेताचे लहानपणीचे फोटो शेअर करत तिच्यासाठी खास संदेश लिहिला आहे. त्यांनी ट्विटरवर आपल्या पोस्टमध्ये, ‘बेटियां सबसे अच्छी होती हैं…’ असं लिहून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांच्या या पोस्ट रीट्वीट केल्या आहेत.

‘मला खड्यासारखं बाजूला काढलं… १६ कोटींचं नुकसान झालं…’ हसरा गोविंदा सांगतोय्‌ आपली रडकथा!’