अमिताभ बच्चन यांनी पान मसाला ब्रॅण्डशी मोडला कर...

अमिताभ बच्चन यांनी पान मसाला ब्रॅण्डशी मोडला करार, जाहिरातीसाठी मिळालेलं मानधन केलं परत (Amitabh Bachchan Terminates Contract With Pan Masala Brand, Returns Fees)

बिग बी आज आपला ७९वा वाढदिवस साजरा करत आहेत, तेच दुसरीकडे बिग बी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या पान मसालाच्या जाहिरातीमुळे काही दिवसांपूर्वी टीकेचा सामना करावा लागला होता. अमिताभजीं सारख्या गडगंज श्रीमंत कलाकाराला, तरुणांना चुकीचा संदेश देणारी जाहिरात का करावी लागली, असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात होता. चाहत्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना अमिताभ यांनी ‘जाहिरातीचे जसे पैसे मिळतात आणि तसाच अनेकांना रोजगारही मिळतो’, असं म्हटलं होतं.

मात्र त्यानंतर आता बिग बींनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी पान मसाला कंपनीसोबत जाहिरातीसाठी केलेला करार मोडला आहे. एवढचं नव्हे तर या जाहिरातीसाठी मिळालेलं मानधन देखील त्यांनी परत केलं आहे. बिग बींनी करार मोडत असताना ही जाहिरात ‘सरोगेट जाहिरात’ श्रेणीत येत असल्याची त्यांना कल्पना नव्हती असं स्पष्टीकरण दिलंय. काही दिवसांपूर्वीच एका राष्ट्रीय तंबाखू विरोधी संघटनेने बिग बींना या जाहिरातीतून बाहेर पडण्याची मागणी केली होती. त्यानंतर बिग बींनी हे पाऊल उचललं आहे.

Amitabh Bachchan, Contract, Terminates, Pan Masala Brand

एका अधिकृत निवेदनातून अमिताभ यांनी ‘कमला पसंद’ ब्रॅडशी करार संपवल्याचं जाहीर केलं आहे. तसेच या निवेदनात अमिताभ यांनी ब्रॅण्डशी करार मोडून प्रमोशनसाठी मिळालेली रक्कम देखील परत केली असल्याचं सांगण्यात आलंय. सरोगेट जाहिरातीची श्रेणी म्हणजेच सिगारेट, तंबाखू सारख्या जाहिराती ज्यांच्यावर बंदी आहे किंवा जी ठराविक वयोगटासाठी आहे असा होतो.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम