‘चुपके चुपके’ चित्रपटाला झाली ४६ वर...

‘चुपके चुपके’ चित्रपटाला झाली ४६ वर्षे; जलसा या बंगल्याचा इतिहास सांगतोय्‌ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Shares Pics Of Movie ‘Chupke Chupke’; Reveals The History Of His Bunglow Jalsa)

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सदैव सक्रीय राहत असल्याने नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच असा एक आठवणीतला फोटो त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो ‘चुपके चुपके’ चित्रपटातला आहे. या चित्रपटाला ४६ वर्षे पूर्ण झालीत. यामध्ये धर्मेन्द्र – शर्मिला टागोर व अमिताभ बच्चन – जया भादुरी, अशा दोन जोड्या होत्या. सदर छायाचित्रात अमिताभ-जया दिसत आहेत. या फोटोचे एक वैशिष्ट्य आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘चुपके चुपके’ या चित्रपटाचे शूटिंग ज्या बंगल्यात झाले होते, तो बंगला पार्श्वभूमीवर दिसतो आहे. आता जुहूचा हा बंगला अमिताभच्या ताब्यात आहे. जलसा, असं या बंगल्याचं नाव त्याने ठेवलं असून तिथे तो जया – अभिषेक – ऐश्वर्या – आराध्या यांच्यासह राहतो. सदर चित्रपटास ४६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमिताभने ट्वीटर अकाऊंटवर लिहिले आहे की, ”हृषिदा यांच्या बरोबर केलेल्या ‘चुपके चुपके’ ला आज ४६ वर्षे झाली. जया आणि माझ्या फोटोत जे घर तुम्ही बघताय्‌ ते निर्माते एन. सी. सिप्पी यांचं घर होतं. ते आम्ही विकत घेतलं… नंतर हा बंगला विकला…पुन्हा विकत घेतला… नूतनीकरण केलं. अन्‌ आता आमचा हा जलसा बंगला आहे… आनंद, नमकहराम, चुपके चुपके, सत्ते पे सत्ता अशा बऱ्याच चित्रपटांचं शूटिंग इथे झालं आहे.”

फोटो सौजन्य :ट्वीटर