अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत...

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिषेक उत्तराधिकारी असल्याचे घोषित केले (Amitabh Bachchan shares a heartfelt post for Abhishek, Writes- My truest inheritor, my pride, my ultimate joy)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ज्याप्रमाणे उत्कृष्ठ अभिनेते आहेत त्याचप्रमाणे ते एक चांगले वडील सुद्धा आहेत. कौटुंबिक तत्वांवर विश्वास ठेवणाऱ्या बिग बींचे त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. त्यांच्या कुटुंबातील कोणताही आनंदाचा क्षण असो, अभिषेकचा कोणता चित्रपट प्रदर्शित होणार असो, सून ऐश्वर्या किंवा नात आराध्याने काही खास केले असेल तर बिग बी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या कुटुंबासोबतचे क्षण चाहत्यांशी शेअर करतात.

अमिताभ यांचे त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनवर खूप प्रेम आहे. ते वेळोवेळी त्याला मार्गदर्शन करत असतात.

बिग बी सोशल मीडियावर किती सक्रिय असतात हे आपण सगळेच जाणतो. त्यांनी आता त्यांच्या मुलासाठी एक खास  पोस्ट शेअर केली आहे. सध्या ती पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणारे अमिताभ बच्चन रोज त्यांचे विचार त्यांच्या चाहत्यांशी शेअर करतात. अनेकदा ते सोशल मीडियावर चित्रपटांसंबंधी प्रतिक्रिया देत असतात. पण यावेळी मात्र त्यांनी त्यांच्या मुलासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमधून त्यांनी अभिषेक त्यांचा उत्तराधिकारी असेल असे जाहिर केले आहे.

बिग बींनी इन्स्टाग्राम आणि ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यानी दोन फोटो एकत्र करुन पोस्ट केले आहेत. त्यातील एका फोटोत त्यांना त्यांच्या चाहत्यांनी घेरले आहे तर दुसऱ्या फोटोत अभिषेकला त्याच्या चाहत्यांनी घेरले आहे. या फोटोला कॅप्शन देत ते म्हणाले, ‘’माझा मुलगा, माझा मुलगा आहेस म्हणून माझा उत्तराधिकारी नाही होऊ शकत, जो माझा उत्तराधिकारी आहे तो माझा मुलगा असेल. तू अभिषेक आहेस, माझा खरा उत्तराधिकारी, माझा अभिमान,माझा सगळा आनंद.‘’

अमिताभ यांच्या पोस्टवर अभिषेकने हात जोडायच्या इमोजीने आभार व्यक्त केले आहेत. दोघांचे चाहते ही बिंग बींच्या या पोस्टवर खूप खुश आहेत.

अभिषेकचा दसवी हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच अमिताभ यांनी ही पोस्ट शेअर करुन अभिषेकचे खूप कौतुक करुन त्याला त्यांचा उत्तराधिकारी बनवले आहे. सध्या बिग बींची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.