अमिताभ बच्चनने केला ‘विदाउट टिकिट’ ...

अमिताभ बच्चनने केला ‘विदाउट टिकिट’ ट्रेनचा प्रवास (Amitabh Bachchan Reveals Story Of Travelling In Train Without Ticket)

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन, स्पर्धकाला बोलके करतो आणि त्याच्या जीवनातील गमती जमती घेतो. तो स्वतः हि काही किस्से शेअर करत असतो. अलीकडे त्याने आपल्या जीवनातील मजेदार किस्सा ऐकवला. कोणे एके काळी या महानायकावर विनातिकीट प्रवास करण्याची वेळ आली होती. अन् तिकीट तपासणीसाने त्याला पकडल होतं.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

अमिताभच्या ऐन तरुण वयातील हा प्रसंग आहे. विनातिकीट प्रवास करण्याची वेळ आली, तेव्हा तो घाबरला. पण त्याच्या मित्रांनी त्याला भरीस पडल. त्यांन ऐकलं पण तिकीट तपासणीसाने त्याला पकडल. अन् तिकीट नसल्यामुळे त्याने धोक्याची साखळी खेचली अन् अमिताभला मित्रासह ट्रेनबाहेर काढलं.