अमिताभ यांना कॉलेजमध्ये ‘या’ नावाने...

अमिताभ यांना कॉलेजमध्ये ‘या’ नावाने चिडवायच्या मुली (Amitabh Bachchan Reveal In Kbc 14 Girls Used To Call Him Camel In College)

अमिताभ बच्चन यांचा केबीसी (कौन बनेगा करडपती) हा शो अतिशय लोकप्रिय आहे. या ‘शो’चा हा चौदावा हंगाम सुरु आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक रंजक किस्से समोर येत असतात.

यावर्षीच्या केबीसी शोमधील एका भागामध्ये अमिताभ बच्चन हे आपल्या कॉलेजमधील आठवणींना उजाळा देताना दिसून आले. सोनी टिव्हीकडून त्याचे प्रोमो प्रक्षेपित केले जात आहेत.

केबीसी १४मध्ये मध्य प्रदेशातील भूपेंद्र चौधरी हे हॉटसीटवर पोहोचले आहेत. हसत्या-खेळत्या स्वभावाचे भूपेंद्र यांच्यासोबत अमिताभ यांनीही धम्माल केलीय. सोनी टीव्हीने जारी केलेल्या व्हीडिओमध्ये भूपेंद्र चौधरी हे अमिताभ बच्चन यांना खास प्रश्न विचारताना दिसत आहेत.

”माझ्या कॉलेजमध्ये ५-६ मुली होत्या. त्या मला शाहरुख खान म्हणायच्या.” भूपेंद्र यांनी हे सांगितल्यानंतर शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये ते हसून दाखवतात. त्यानंतर ते अमिताभ यांना विचारतात, ”तुम्हाला कॉलेजमध्ये मुली कोणत्या हिरोच्या नावाने बोलवायच्या” त्यावर अमिताभ यांनी ”त्या मला उंट म्हणून हाक मारायच्या” असे सांगितले. त्यानंतर एकच हशा पिकला. हा प्रोमोचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. लोकांना हा प्रोमो आवडल्याने कमेंट्सचा पाऊसही पडतोय.