अमिताभ बच्चनने जागवल्या होळीच्या आठवणी… च...

अमिताभ बच्चनने जागवल्या होळीच्या आठवणी… चाहत्यांना दिल्या शुभेच्छा (Amitabh Bachchan Remembers Holi; Wishes Fans In A Special Way)

फोटो सौजन्य:ट्वीटर
बॉलिवूडमध्ये धुळवड खूपच धमाल पद्धतीने साजरी केली जाते. त्यामध्ये अमिताभ बच्चनच्या घरी खेळल्या जाणाऱ्या धुळवडीचा उल्लेख हटकून येतोच. त्याच्या घरी होळीच्या दिवशी उत्सवाचे वातावरण असते. गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावाने ही होळी रंगली नव्हती. यंदाही होणार नाही. पण अमिताभने आपल्या सोशल अकाऊंटवर आधीच्या होळीच्या आठवणी जागविल्या आहेत. अन्‌ चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम
या ब्लॅक अन्ड व्हाईट फोटोमध्ये अमिताभ सोबत जया आणि लहान अभिषेक दिसतो आहे. सगळे रंगात भिजलेत हा फोटो पोस्ट करून अमिताभ लिहितो – ” रंग बरसे भिगे चुनर वाली… रंग बरसे… होली है.” या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी जुने काही फोटो टाकून त्याला शुभेच्छा दिल्या.

फोटो सौजन्य:ट्वीटर

फोटो सौजन्य:ट्वीटर

फोटो सौजन्य:ट्वीटर

अमिताभने रंगपंचमाच्या आधल्या दिवशी होलिका दहनाचे पर्व मानत, लोकांना शुभकामना दिल्या आणि भारताने इंग्लंडविरूद्ध वन डे मालिका जिंकल्याबद्दल क्रिकेट टीम इंडियाचे अभिनंदन केले.

फोटो सौजन्य:ट्वीटर

फोटो सौजन्य:ट्वीटर

अमिताभ आणि होळी यांचं नातं तसं गहिरं आहे. त्याच्यावर चित्रित झालेली ‘रंग बरसे’, तसेच ‘बागबान’ मधील ‘होली खेले रघुबीरा’ ही गाणी अधिक लोकप्रिय आहेत. जी होळीच्या निमित्ताने ऐकवली जातात. या वर्षी अमिताभच्या घरी होळी साजरी होणार नाही, पण तो आपल्या चाहत्यांना शुभेच्छा द्यायला विसरला नाही.

पुरुषांच्या इंद्रियावर कमेंट करून दिया मिर्झाने माजवली खळबळ… (Dia Mirza’s Comment On Mens Private Part; People Surprised By Tweet)