अमिताभ बच्चन यांचा प्रोजेक्ट के च्या शूटिंग दरम...

अमिताभ बच्चन यांचा प्रोजेक्ट के च्या शूटिंग दरम्यान अपघात (Amitabh Bachchan injured during Project K shoot in Hyderabad)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. खुद्द अमिताभ यांनीसुद्धा त्यांच्या ब्लॉगवर आपल्याला दुखापत झाल्याचे चाहत्यांना सांगितले आहे. त्यांच्या बरगडीला मार लागला आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर, हैदराबाद येथे सुरु असलेल्या त्यांचा आगामी चित्रपट प्रोजेक्ट के च्या शूटिंग दरम्यान जखमी झाल्याचे सांगितले. त्यांना फारशी दुखापत झाली नसली तरी डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

अमिताभ बच्चन हैदराबादमध्ये शूटिंग करत होते आणि अॅक्शन सीन करताना त्यांना दुखापत झाली. त्याच्या उजव्या बरगडीला दुखापत झाली आहे, दुखापतीनंतर शूटिंग रद्द करण्यात आले असून त्यांना हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिथे डॉक्टरांनी त्यांचे सीटी स्कॅन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या बरगडीला दुखापत झाली असून जास्त चालण्यामुळे बरगडीत आणखी वेदना होऊ शकतात त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सीटी स्कॅन करून अमिताभ बच्चन मुंबईत परतले आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटिंग काही काळ थांबवण्यात आले आहे.

शूटिंगदरम्यान जखमी झाल्यानंतर सुपरस्टार मुंबईतील आपल्या घरी परतले आहेत. घरी आल्यानंतर अमिताभ यांनी ही बातमी आपल्या ब्लॉगद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली. अमिताभ यांनी आपण बरे असल्याचेही चाहत्यांना सांगितले. यासोबतच अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये असेही लिहिले आहे की, दुखापतीमुळे ते आपल्या प्रियजनांना भेटू शकणार नाहीत. त्यामुळे जलसाच्या गेटवर कोणीही येऊ नाही. हे तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांनाही सांगा. बिग बी प्रत्येक रविवारी जलसाच्या गेटवर आपल्या चाहत्यांना अभिवादन करतात.