अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदाच्या साधेपणानं...

अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदाच्या साधेपणानं जिंकली चाहत्यांची मनं (Amitabh Bachchan grand daugher navya naveli nanda trip to bhopal leaves fans amazed praises her simplicity)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सध्या मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये फिरण्याचा आनंद घेतेय. नव्याने तिच्या या भोपाळ ट्रिपमधील काही खास फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नव्याने भोपाळमधील काही प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली आणि त्याचसोबत सर्वसामान्यांप्रमाणे रस्त्यावरील चाट-पापडीचाही आस्वाद घेतला. तिचे हे फोटो पाहून नेटकरी तिच्या साधेपणाच्या प्रेमात पडले आहेत.

नव्या नवेली नंदा हे नाव जितकं मोठं आहे तितकेच तिचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. याच कारणामुळे तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. नुकतेच भोपाळला फिरायला गेलेल्या नव्याने तेथील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. या फोटोंमध्ये ती सहलीचा पूर्ण आनंद घेताना दिसत आहे.

नव्या बहुतांश वेळी मेकअपविना पाहायला मिळते. पांढऱ्या रंगाचा टॉप आणि ट्राऊजर आणि त्यावर काळ्या रंगाचा कार्डिगन असा तिचा साधा लूक आहे. मात्र हाच साधेपणा नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे.

नव्याने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने भोपाळच्या मार्केटपासून ते खाऊगल्ल्यांपर्यंतची झलक दाखवली आहे. चाट, भेळ, पकोडे आणि मिरची अशा स्ट्रीट फूडचा तिने आस्वाद घेतलाय. एका फोटोमध्ये तर ती चक्क रस्त्यावरील एका दुकानात केस कापताना दिसतेय.

नव्याच्या या फोटोंवर चाहत्यांसह तिची खास मैत्रीण अनन्या पांडे आणि आई श्वेता बच्चन यांनीसुद्धा कमेंट्स केल्या आहेत. ‘तू अत्यंत विनम्र वाटतेस, अशीच राहा’, असं एका युजरने लिहिलं. तर काहींनी तिला भोपाळमधल्या आणखी काही स्ट्रीट फूड्सचा आस्वाद घेण्याचा सल्ला दिलाय. ‘स्टारकिड असून तू इतरांपेक्षा खूप वेगळी आहेस. तोकडे कपडे घालणाऱ्या त्या इतर स्टारकिड्सपेक्षा तुझा साधेपणा खूप जास्त आकर्षित करतो’, असंही एका युजरने म्हटलंय.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)