अमिताभ बच्चन यांनी या कारणामुळे सोडला मांसाहार,...

अमिताभ बच्चन यांनी या कारणामुळे सोडला मांसाहार, केबीसीच्या सेटवर केलं स्पष्टीकरण (Amitabh Bachchan Gave Up Non-Vegetarian Food For This Reason, Explained On The Sets Of KBC)

कौन बनेगा करोडपती या शोमध्ये बिग बी अमिताभ बच्चन स्पर्धकांसोबत गप्पा गोष्टी मारण्यासोबतच आपल्या आयुष्यातील काही रंजक किस्सेही शेअर करत असतात. बिग बींच्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील किस्से ऐकणे ही एक प्रकारची पर्वणीच असते. आता या शोचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये हॉटसीटवर बोईसरमध्ये राहणाऱ्या विद्या उदय रेडकर बसल्या आहेत. या व्हिडीओमध्ये अमिताभ आणि विद्या ‘केबीसी’च्या खेळादरम्यान गप्पा मारत असल्याचे दिसते. विद्या यांच्याशी गप्पा मारताना बिग बींनी आपली पत्नी जयाला मासे खायला फार आवडतात असे सांगितले.

गेली कित्येक वर्षे बिग बी कौन बनेगा करोडपती या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. हॉटसीटवर बसल्यावर स्पर्धकांना टेन्शन आलेले असते. त्यामुळे वातावरण हलकेफुलके करण्यासाठी बिग बी हास्यविनोद करुन काही रंजक किस्से सांगतात. यावेळी ते विद्या यांच्याशी मांसाहार या विषयावर गप्पा मारत होते.

अमिताभ यांनी विद्या यांना‘तुम्हाला कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो?’असे विचारले. त्यावर विद्या यांनी ‘मला मांसाहार करायला आवडतो. त्यामध्ये मासे मला फार आवडतात’ असे सांगत पुढे ‘जया बच्चन यांना सुद्धा मासे आवडतात ना?’ असा प्रतिप्रश्न केला. त्यावर अमिताभ यांनी होकार दिला. त्यानंतर त्यांनी ‘तुम्हालाही मासे खायला आवडतात का’ असा प्रश्न केला. त्यावेळी त्यांनी ‘मी मासे खाणं खूप आधीच बंद केलं आहे. बरेचसे पदार्थ खाणं सोडलं आहे.’असे सांगितले

ते पुढे म्हणाले, “मी तारुण्यात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे. वय झाल्यापासून मांसाहार न करण्याचा मी निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी गोड खाणंही सोडलं आहे. भात, पान आणि अजून बऱ्याचशा गोष्टी खाणं मी आजकाल टाळतो. जाऊ द्या मी आता पुढे बोलतं नाही.” याआधी त्यांचा ‘गुड बाय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.