प्रशांत दामले यांच्या विक्रमी प्रयोगासाठी अमिता...

प्रशांत दामले यांच्या विक्रमी प्रयोगासाठी अमिताभ बच्चन यांनी दिल्या खास मराठीतून शुभेच्छा (Amitabh Bachchan Gave Best Wishes To Prashant Damle In Marathi, For His Record Making Play)

मराठी नाट्यविश्वाचा राजा म्हणून ओळखले जाणारे प्रशांत दामले यांनी नुकतेच आपल्या नाटकाचे 12500  प्रयोग पूर्ण झाले. त्यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकिय, कला, क्रिडा क्षेत्रातून त्यांचे कौतुक केले जात आहे. अशातच हिंदीसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील प्रशांत दामले यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे बिग बींनी प्रशांत दामले यांना मराठीतून शुभेच्छा दिल्या.

अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, प्रशांत दामले यांचा १२५०० प्रयोगांचा विक्रम आज होतो आहे. ३९ वर्षांत एवढे प्रयोग करणं ही कौतुकाची गोष्ट आहे! मी ‘एका लग्नाची गोष्ट’ या १००० व्या प्रयोगाला गेलो होतो. आज मी उपस्थित नसलो तरी मनाने मी तिथेच तुमच्याबरोबरच आहे! माझ्याकडून प्रशांतजींना हार्दिक शुभेच्छा!

प्रशांत दामले गेली 39 वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत.  टूरटूर, चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे अशा अनेक नाटकांमधून त्यांनी रंगभूमी गाजवली. याशिवाय त्यांनी वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी अशा काही चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले.