तब्येतीच्या कारणावरून यापूर्वी देखील अमिताभने क...

तब्येतीच्या कारणावरून यापूर्वी देखील अमिताभने केल्या होत्या हॉस्पिटलच्या वाऱ्या (Amitabh Bachchan Frequent Hospitalization : A Cause Of Concern)

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अमिताभ बच्चनने यापूर्वी देखील हॉस्पिटलच्या वाऱ्या केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये घबराट पसरल्याचा पूर्वेतिहास आहे. तब्येतीच्या कारणावरून त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्या होत्या. अन्‌ त्याला बरं वाटावं म्हणून लाखो चाहत्यांनी प्रार्थना केल्या होत्या.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

‘कूली’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अमिताभला मोठी जखम झाली होती. १९८२ साली झालेल्या या अपघातापासून त्याच्या आरोग्यात वारंवार बिघाड होत राहिले. कुलीच्या शूटिंग दरम्यान झालेल्या अपघातात त्याची हालत इतकी गंभीर झाली होती की जगतो की वाचतो, असं लोकांना वाटत होतं. नंतर एका मुलाखतीत अमिताभने स्वतःच सांगितलं होतं की, व्हेंटिलेटर वर ठेवण्यापूर्वी डॉक्टरांनी मला ‘क्लिनिकली डेड’ असं घोषित केलं होतं.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

या स्थितीत अमिताभ हॉस्पिटलात मृत्युशी झुंज देत होता. अन्‌ देशभरातील चाहते त्याला जीवनदान मिळावे म्हणून मंदिर-मशिदीतून प्रार्थना करीत होते. जणू काही लोकांच्या प्रार्थनेचा परिणाम म्हणून की काय, कोमात गेलेला अमिताभ बचावला. अन्‌ चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अमिताभ जिथे दाखल झाला होता, त्या हॉस्पिटलच्या बाहेर व त्याच्या घराबाहेर लोकांचा महासागर उसळला होता.

फोटो सौजन्य – गुगल

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

२००५ साली अमिताभच्या लहान आतड्याचे ऑपरेशन मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलात झालं. तेव्हाही त्याला आराम पडावा म्हणून चाहत्यांचं अलोट प्रेम दिसून आलं होतं.
पोटात दुखू लागलं म्हणून २००८ साली अमिताभ पुन्हा एकदा हॉस्पिटलात दाखल झाला होता.

फोटो सौजन्य – गुगल

लिव्हर बिघडलं म्हणून २०१२ साली त्याला हॉस्पिटलची वारी करावी लागली होती. ऑपरेशन झाल्यावर त्याची तब्येत सुधारली खरी, पण लिव्हरच्या नाजुक स्थितीशी तो अजूनही लढतो आहे. असं म्हणतात की, अमिताभला खाण्यापेक्षा औषधंच जास्त खावी लागतात.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

२०१८ साली ‘ठग्ज्‌ ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, जोधपूरला अमिताभला मान आणि पाठदुखीचा इतका त्रास झाला की, त्याला त्वरीत मुंबईला आणण्यात आलं. इलाज झाले त्यानंतर त्याची पत्नी जया बच्चनने लोकसभेत घोषणा केली की, ते आता ठीक आहेत, पण पाठ व मान अजूनही दुखते.

फोटो सौजन्य – गुगल

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

त्याच्या आतड्याच्या आजारपणाने २०१९ साली पुन्हा एकदा डोकं वर काढलं आणि त्याला पुन्हा एकदा हॉस्पिटलात भरती व्हावं लागलं. ३ दिवस त्याच्यावर उपचार झाले अन्‌ आतड्यांना सुस्थितीत आणले गेले.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

मागच्याच वर्षी बिग बीला करोनाने गाठले. त्यासाठी त्याला बरेच दिवस हॉस्पिटलात काढावे लागले. या आजारपणात त्याला श्वसनाचा त्रास झाला नि काही दिवस आयसीसीयू मध्ये राहावे लागले. २ ऑगस्टला त्याच्या करोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तेव्हा तो घरी आला.

 फोटो सौजन्य – गुगल

आत्ताच्या आजारपणात अशी माहिती मिळाली आहे की, डोळ्याच्या सर्जरीनंतर अमिताभ घरीच आराम करतो आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. बिग बी ची प्रकृती बिघडते तेव्हा सगळ्यांनाच चिंता लागून राहते. केवळ भारतातच नव्हे तर अमिताभचे चाहते जगभर असल्याने ते त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत राहतात.