अमिताभ बच्चनने पूर्वी केलेल्या मॉडेलिंगचे फोटो ...

अमिताभ बच्चनने पूर्वी केलेल्या मॉडेलिंगचे फोटो प्रकट झालेत (Amitabh Bachchan Did Modelling Too : Big B Himself Shared The Throwback Photo)

महानायक अमिताभ बच्चनसाठी जीव टाकणारे लोक आहेत. कारण आपल्या अभिनयाच्या उत्तुंग कामगिरीने त्यांनी जगभरात चाहतावर्ग निर्माण केला आहे. वाढत्या वयातही त्यांचा काम करण्याचा हुरुप वाखाणला जात आहे.

Amitabh Bachchan, Modelling, Throwback Photo

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

पण याच अमिताभजींनी कोणे एके काळी मॉडेलिंग क्षेत्रात मुशाफिरी केली आहे, हे फारच कमी लोकांना माहीत आहे. पूर्वी केलेल्या मॉडेलिंगचे फोटो त्यांनी स्वतःच इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. जे वेगाने पसरत आहेत. या फोटोंमध्ये अमितजी किती स्टाईलमध्ये पोजेस्‌ देत आहेत, ते पाहून त्यांचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

आपले फोटो प्रसिद्ध करून अमितजी म्हणतात – ‘ते दिवस पुन्हा आलेत, तर किती छान होईल… पण…’ त्यांचे हे वक्तव्य वाचून लक्षात येतं की, त्यांना जुन्या आठवणींनी व्याकुळ केले आहे.

Amitabh Bachchan, Modelling, Throwback Photo

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आपल्या आवडत्या मेगास्टार बद्दल त्यांचे चाहते भरपूर प्रतिक्रिया देत आहेत. एक जण म्हणतो – ‘कठोर परिश्रमाबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तुम्ही अतिशय चांगली व्यक्ती आहात.’ तर दुसऱ्या एकानं असाही शेरा मारला आहे की, ‘रेखाजी उगाच फिदा झाल्या नव्हत्या…’

Amitabh Bachchan, Modelling, Throwback Photo

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अमितजींनी अतीव उंचीवर नेऊन ठेवलेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम सध्या चालू आहे. अलिकडेच त्यांची भूमिका असलेला ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ब्रह्मास्त्र, झुंड, मे डे, बटरफ्लाय, गुडबाय हे त्यांचे आगामी चित्रपट आहेत.