अमिताभ बच्चन – माधुरी दीक्षित यांनी एकत्र...

अमिताभ बच्चन – माधुरी दीक्षित यांनी एकत्र काम कां नाही केले? कारण ऐकताच गार व्हाल! (Amitabh Bachchan And Madhuri Dixit Never Worked Together : The Reason Will Shock You)

महानायक अमिताभ बच्चन आजही यशोशिखरावर आहे. अन सौंदर्यवती माधुरी दीक्षित कित्येक वर्षे नंबर वन हिरोईन म्हणून ख्यातकीर्त झाली होती. आजही तिचा चाहतावर्ग मोठा आहे. पण हे दोन दिग्ग्ज कलाकार एकत्र चित्रपटात दिसले नाहीत. कारण ऐकाल तर तुम्ही गार व्हाल!

नाही म्हणायला, हे दोघे ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटातील ‘ओये मखना ‘ या गाण्यात एकत्र चमकले होते. हे गाणेही खूप हिट झाले तरी ही जोडी एकत्र दिसली नाही.

माधुरीने ऐंशीच्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा बिग बी सुपरस्टार झाला होता. माधुरीचे सुरुवातीचे काही चित्रपट तिकीट बारीवर सपशेल आपटले होते. तिला एका हिट चित्रपटाची गरज होती. अशा बिकट काळात अनिल कपूरची व तिची जोडी सिनेमात मस्त जमली.

बेटा, तेजाब, हिफाजत, परिंदा असे या जोडीचे चित्रपट यशस्वी ठरले. माधुरी स्टार बनली. अन माधुरी – अनिल ही जोडी हिट झाली. असं म्हटलं जातं की, या कालखंडात अनिल कपूर, माधुरीच्या फारच जवळचा ठरला होता. दोघांच्या अफेअरचे किस्से बाहेर येत होते. माधुरीच्या संबंधांत अनिल फारच स्वामित्व गाजवू लागला होता. असंही म्हटलं जात होत. तशातच माधुरीला, अमिताभ बरोबर काम करण्याची ऑफर  आली. पण अनिलने मोडता घातला. अन माधुरी, अमिताभ सोबत चित्रपट करू शकली नाही.

या संदर्भात असंही  कळलं आहे की, अनिल कपूरने माधुरीची जोडी, सनी देओल सोबत देखील चित्रपट करू दिला नाही. म्हणूनच ‘त्रिदेव’ नंतर माधुरी – सनी एकत्र येऊ शकले नाहीत.

अनिलच्या या सर्व काटाकाटीच्या वागण्याने माधुरी जाम वैतागली होती, असंही कळतं. म्हणून मग तिने अनिलशी फटकून वागायला सुरुवात केली. इतकंच नव्हे, तर  तिने अनिल बरोबर चित्रपट करणे सोडून दिले. मात्र अनेक वर्षांनंतर हे दोघे ‘टोटल धमाल’ मध्ये एकत्र आले होते.