46 वर्षांची अमीषा पटेल तिच्या हॉट आणि बोल्ड फोट...

46 वर्षांची अमीषा पटेल तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी वाढवतेय सोशल मीडियाचे तापमान (Amisha Patel’s Stunning Hot And Bold Look Raised The Temperature On Social Media)

बॉलिवू़ड अभिनेत्री अमीषा पटेल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मीडियाच्या चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या बोल्ड लूकमुळे तिच्या चाहत्यांना घायाळ करण्याचा प्रयत्न करत असते. आता पुन्हा एकदा अमीषाने सोशल मीडियाचे तापमान वाढवण्यासाठी बोल्ड आणि हॉट फोटो शेअर केले आहेत.

अमीषा सध्या चित्रपटात काम करत नसली तरी ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. ती दररोज कोणता ना कोणता व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करतच असते. पण तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये सर्व बोल्डनेसची हद्द पार केली दिसते.  तिच्या त्या फोटोंमुळे चाहत्यांची झोप उडाली आहे. त्या फोटोत तिने पारदर्शक स्विमसूट घातला आहे.

अमीषा भलेही चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. अमीषाने ह्रतिक रोशन सोबत कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने जेव्हा तिच्या करीअरची सुरुवात केलेली तेव्हा अनेकजण तिच्या निरागस चेहऱ्याचे दिवाणे झाले होते. पण सध्याचा तिचा हॉट अवतार पाहून अनेकजण आश्चर्यचकित होतात. अमीषाने पुन्हा एकदा तिच्या हॉटनेस लोकांना घायाळ केले आहे.

पोस्ट केलेल्या फोटोत अमीषा खूप बोल्ड दिसत आहे. त्या बोल्ड लूकला साजेसा असा तिने लाइट मेकअप केला आहे व केस मोकळे सोडले आहेत. कानात तिने हूप ईयररिंग्स घातले आहेत. आणि डोळ्यांवर काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे. या फोटोत ती बिकिनीवर पूल शेजारी पोज देत आहे. अमीषा सध्या 46 वर्षांची आहे. काही दिवसांपूर्वी ती गदर 2 या चित्रपटासाठी चर्चेत होती.