फाल्गुनी पाठकच्या वादादरम्यान नेहा कक्कड झाली द...

फाल्गुनी पाठकच्या वादादरम्यान नेहा कक्कड झाली देवी मातेच्या भक्तीत तल्लीन (Amidst Controversy With Falguni Pathak, Neha Kakkar Seeks Blessing Of Mata Durga, Shares Pics Worshipping Mata Durga)

गायिका नेहा कक्कड सध्या आपल्या ‘ओ सजना’ या नवीन गाण्याच्या वादामुळे चर्चेत आहे. नुकतेच रिलीज झालेले हे गाणे फाल्गुनी पाठकच्या ‘मैने पायल जो छनकाई’ या सुपरहिट गाण्याचे रिक्रिएशन आहे. हे गाणे रिलीज झाल्यापासून नेहा कक्कड ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. या लोकप्रिय गाण्याबद्दल, सोशल मीडियावर वापरकर्ते आणि फाल्गुनी पाठक नेहाला वाईटरित्या ट्रोल करत आहेत. नेहा सुद्धा सतत ट्रोल करणाऱ्यांना उत्तरे देत असते.

पण या सर्व वादांदरम्यान, नेहा कक्कड देवीच्या भक्तीत तल्लीन झाली आहे. देवीसोबतचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज देशभरात नवरात्री साजरी होत असताना सर्वजण देवीच्या भक्तीमध्ये दंगले आहेत, तसेच नेहा कक्कड हिनेही खास पद्धतीने देवीची पूजा केली. तिच्या पूजेचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

नेहा कक्कडने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती देवीची पूजा करताना दिसत आहे. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की नेहा कक्कड देवीच्या मूर्तीसमोर आरतीचे ताट घेऊन उभी आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची पूजा करून तिचे आशीर्वाद घेत आहे.

लूकबद्दल बोलायचे झाले तर नेहा भारतीय लूकमध्ये दिसत असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. नेहाने देवीच्या पूजेसाठी जांभळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि गुलाबी घागऱ्यासोबत गुलाबी ओढणी परिधान केली आहे. नेहाने हलका मेकअप, मोकळे केस आणि गळ्यात चोकर घालून आपला लूक पूर्ण केला आहे. हातात पूजेचे ताट आणि चेहऱ्यावर हसू असलेली नेहा खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये ‘जय माता दी’ असे लिहिले आहे. नेहा बालपणी जागरणात गाणी गायची. वयाच्या चौथ्या वर्षीच तिने आपल्या भावंडांसोबत गायला सुरुवात केली होती. तेव्हापासून दरवर्षी ती देवीची मनोभावे पूजा करते.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम