वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आमीर खानने आपल्या ...

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आमीर खानने आपल्या बाल्कनीत फडकावला तिरंगी झेंडा (Amidst Controversies And Complaints Aamir Khan Raised The Tricolor With His Daughter Ira Khan)

‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटावर बहिष्कार व केलेल्या तक्रारींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आमीर खानने ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेत सामील होऊन तिरंगी झेंडा फडकावला. मुंबईतील आपल्या घराच्या बाल्कनीत झेंडा रोवून आमीरने, आपली मुलगी इरा हिच्यासोबत फोटो प्रसिद्ध केले. ते अधिकच व्हायरल होत आहेत.

‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटावर बहिष्कार टाका, या मागणीमुळे आमीर खान चर्चेत आला. पण दुसरीकडे या चित्रपटाचे कलाकार हा चित्रपट पाहण्याची विनंती करत आहेत.

या पार्श्वभूमीवर आमीर खानने, आपल्या घरावर तिरंगा लावण्याला विशेष अर्थ प्राप्त झाला आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सरकारने सर्व लोकांना आवाहन केले आहे की, १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरांवर तिरंगा लावावा. त्याला आमीरने प्रतिसाद दिला. घराच्या बाल्कनीत झेंड्यासोबत आमीर व त्याची मुलगी इरा दिसते आहे.

आमीर खान चार वर्षानंतर, या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर दिसतो आहे. टॉम हॅन्क्सच्या ‘द फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूडमधील चित्रपटाचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत करीना कपूर खान, नागा चैतन्य, मोना सिंह हे कलाकार आहेत.