‘लाल सिंह चड्ढा’ वर बहिष्काराची मागणी होताच आमी...

‘लाल सिंह चड्ढा’ वर बहिष्काराची मागणी होताच आमीर खानचा बचावाचा पवित्रा : म्हणतो – ‘मला भारत देश आवडत नाही, असं लोकांना का वाटतं?’ (Amidst Boycott Laal Singh Chaddha Twitter trend, Aamir Appeals People to Watch His Film, Says ‘Why Some Feel I Don’t Like India’)

आमिर खान (Aamir Khan) चा ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट ११ ऑगस्ट, २०२२ ला सिनेमाघरामध्ये प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे आणि मि. परफेक्शनिस्ट सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आपल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका करावा अशी त्याची इच्छा आहे, परंतु प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटावर संकट घोंगावत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर आमिरच्या या चित्रपटाबद्दल भयंकर राग व्यक्त होत असल्याचे दिसत आहे. लोक चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. ट्विटर वर #BoycottLaalSinghChaddha ट्रेंड होत आहे. हा चित्रपट कोणी पाहू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे असताना आमीर खानने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतेच जेव्हा आमिरला मीडिया संवादादरम्यान याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “मला दुःख होते. मला या गोष्टीचं वाईट वाटतं की, असे म्हणणाऱ्या काही लोकांना वाटते की मला भारत देश आवडत नाही. त्यांचा यावर विश्वास आहे, पण हे खरं नाही. काही लोकांना असे वाटणे हे दुर्दैव आहे. असे नाहीये. कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका आणि हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहा.”

त्याच्या या वक्तव्यानंतर आता ट्रोलर्स म्हणत आहेत की, आमिर खान प्रेक्षकांसमोर आपला चित्रपट पाहण्यासाठी विनवणी करत आहे. लोक विविध प्रकारच्या कमेंट्स करून आमिर खानची खिल्ली उडवत आहेत आणि लोकांना चित्रपट न पाहण्याचे आवाहन करत आहेत.

२015 मध्ये असहिष्णुतेवरील आमिर खानच्या वक्तव्यासाठी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावेळी आमिर खानने एका मुलाखतीदरम्यान वादग्रस्त विधान केले होते, ज्यामध्ये तो म्हणाला होता की, “भारत खूप सहिष्णू देश आहे, परंतु काही लोक येथे असहिष्णुता पसरवण्याचे काम करत आहेत.” त्याचवेळी त्याची पत्नी किरण रावनेही मुलाच्या सुरक्षेसाठी देश सोडण्याचा विचार करत असल्याचे वक्तव्य केले होते. याशिवाय वर्षांपूर्वी आमिरने सर्वांना शिवलिंगावर दूध अर्पण करणे निरुपयोगी असल्याचे सांगून हे दूध गरिबांमध्ये वाटा असे म्हटले होते. तर दुसरीकडे करीना कपूरने देखील एकदा, ‘आमचे चित्रपट पाहू नका, कोणीही जबरदस्ती करत नाही,’ असे म्हटले होते. हे सगळं होत असताना त्यावेळेस त्यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबियांनादेखील लोकांनी खडे बोल सुनावले होते. त्यांच्या या जुन्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच नेटकरी त्यांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत.

करीना कपूर अभिनीत ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात नागा चैतन्यही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)