घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान शोएब मलिकने शेअर के...

घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान शोएब मलिकने शेअर केला सानिया मिर्झासोबतचा रोमॅण्टिक फोटो (Amid Divorce Rumours, Shoaib Malik Wishes Sania Mirza On Her Birthday With A Romantic Picture, Both Are Set To Feature In A Reality Show)

शोएब मलिक आणि सानिया मिर्झाशी संबंधित अनेक बातम्या सध्या व्हायरल होत आहेत. त्यांच्यात काहीतरी बिनसल्याचे बोलले जात आहे. शोएबच्या एका जवळच्या मित्राने दोघांचा घटस्फोट झाला असून त्यांनी केवळ अधिकृत घोषणा केली नसल्याचे सांगितले.

सानियाने आपल्या पतीवर फसवणूक केल्याचा आरोप केल्याचे म्हटले जाते. शोएबचे एका पाकिस्तानी मॉडेलसोबत अफेअर असल्याची चर्चा सुरु आहे. काही वर्षांपूर्वी शोएबने तिच्यासोबत एक रोमॅण्टिक फोटोशूट केले होते.

आज सानिया आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने तिचा पती शोएबने रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर एक अतिशय रोमॅण्टिक फोटो शेअर करून सानियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शोएबने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, सानियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी तुला निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो… आज खूप मजा कर…

ही पोस्ट पाहून चाहत्यांनाही खूप आनंद झाला असून ते दोघांचेही अभिनंदन करत आहेत. तसेच त्यांची जोडी अशीच कायम राहावी आणि दोघेही सदैव आनंदी रहावेत, अशा शुभेच्छा देत आहेत. तर काही चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. एका चाहत्याने तुम्हाला एकत्र पाहून खूप आनंद झाला, ही पोस्ट त्या लोकांच्या तोंडाला कुलूप लावेल जे तुमच्या दोघांमध्ये घटस्फोटाच्या अफवा पसरवत आहेत अशी कमेंट केली आहे.

एवढेच नाही तर सानिया आणि शोएब लवकरच एका टॉक शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. हा शो पाकिस्तानी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. शोएबने या शोबद्दल आधीच पोस्ट शेअर केली होती. या शोचे नाव द मिर्झा मलिक शो असे असेल.

त्यामुळे या दोघांच्या नात्यामागील नेमके सत्य काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यापूर्वी दोघेही त्यांच्या मुलाच्या वाढदिवशी एकत्र दिसले होते. त्यांचा मुलगा इझानचा वाढदिवस 30 ऑक्टोबरला होता. शोएबच्या जवळच्या मित्राने दोघेही वेगळे झाले आहेत आणि वेगळे राहत आहेत असा दावा केला होता. सानियाच्या इन्स्टा स्टोरीज आणि पोस्ट्स पाहून हे लोक तिच्यात आणि शोएबमध्ये काहीतरी बिनसल्याचा अंदाज बांधत होते.