नवाजुद्दीनच्या आईची तब्येत बिघडली, अभिनेता पोहच...

नवाजुद्दीनच्या आईची तब्येत बिघडली, अभिनेता पोहचला आईला भेटायला पण भावाने गेटवरुनच परतवले (Amid a relationship crisis with wife, Nawazuddin Siddiqui stopped from meeting his ailing mother)

आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यासाठी अधिक चर्चेत आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्याच्या पत्नीने त्याच्यावर वाईट वागणूक, आपल्याला कैदेत ठेवणे आणि उपासमारीचा आरोप केला आहे. अशातच नवाजचा भाऊही त्याच्या विरोधात गेला आहे, त्यामुळे त्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.नव्या माहितीनुसार, त्याच्या भावाने नवाजला त्याच्या आजारी आईला भेटण्यापासून रोखले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाजची पत्नी आणि नवाज यांच्यात सुरू असलेला वाद वाढत चालला आहे. या भांडणात आलियाने नवाजच्या आईलाही अनेकदा ओढले आहे. या सगळ्याचा परिणाम नवाजच्या आईच्या तब्येतीवर झाला असून त्यामुळे नवाजच्या आईचीही प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ढासळत असल्याचे सांगण्यात येत आहे. काल रात्री नवाज आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी वर्सोवा येथील तिच्या बंगल्यावर गेला होता. मात्र त्याला गेटवरच थांबवण्यात आले. नवाजचा सख्खा भाऊ फैजुद्दीन याने अभिनेत्याला आईला भेटू दिले नाही. नवाजच्या आजारी आईला कुटुंबात वाद वाढू द्यायचा नव्हता, म्हणून अभिनेत्याला तिला भेटण्यापासून रोखले गेले आणि नवाजला आईला न भेटता परतावे लागले.

आपल्या पत्नीसोबतच्या वादांमध्ये नवाजचे दोन्ही भाऊ शमस नवाब सिद्दीकी आणि फैजुद्दीन देखील त्याच्या विरोधात गेले आहेत आणि अभिनेत्याच्या विरोधात वक्तव्य करत आहेत, त्यामुळे नवाजच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी वाढत आहेत. अशातच काल भाऊ फैजुद्दीन याने त्याला त्याच्या आईला भेटू दिले नाही, कारण त्याची आई कोणालाही भेटू इच्छित नाही, विशेष म्हणजे नवाज खास आपल्या आईला भेटण्यासाठी डेहराडूनहून मुंबईत पोहोचला होता.

दरम्यान, नवाज आणि त्याची पत्नी आलिया यांच्यातील वाद कोर्टापर्यंत पोहोचला आहे. नवाजने कोर्टात याचिका दाखल करून आपल्या दोन मुलांचे (12 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा) लोकेशन जाणून घेण्याची मागणी केली होती. नवाजची दोन्ही मुले त्याची पत्नी आलियाकडे आहेत. नवाजने सांगितले होते की, मला दुबईतील शाळेतून त्याची मुले शाळेत येत नसल्याचा मेल आला होता. त्यामुळे आपली मुले कुठे आहेत हे त्याला जाणून घ्यायचे आहे. मात्र, त्याच्या याचिकेला उत्तर देताना आलियाच्या वकिलाने सांगितले की, मुले त्यांच्या आईसोबत भारतात आहेत. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, नवाज आणि त्याची पत्नी आलिया यांनी मुलांशी संबंधित प्रकरणे आपापसात सोडवावीत.