अक्षय कुमारने लेक निताराला दिल्या वाढदिवसाच्या ...

अक्षय कुमारने लेक निताराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा… लिहिली भावूक पोस्ट… ‘मोठी होत आहेस, जग जिंकून घे, पण…’ (Always Stay Papa’s Precious li’l Girl… Akshay Kumar Shares Emotional Note For Daughter Nitara On Her Birthday With Adorable Photo)

खिलाडी अक्षय कुमार जे काही करतो ते खरोखर अगदी मनापासून करतो. तो त्याच्या फिटनेस आणि सामाजिक समस्यांबद्दलच्या जागरूकतेसाठी प्रसिद्ध आहेच शिवाय तो अतिशय कौटुंबिक माणूस म्हणूनही सगळ्यांना परिचयाचा आहे. कितीही व्यस्त असला तरी तो आपल्या कुटुंबाला पूर्ण वेळ देतो. सोशल मीडियावरही तो खूप सक्रिय असतो अन्‌ पत्नी ट्विंकल आणि दोन्ही मुलांचे फोटो शेअर करत राहतो.

Akshay Kumar, Emotional Note For Daughter, Nitara, Birthday

असं म्हणतात की, मुली या वडिलांच्या जवळच्या असतात. अक्षयही आपल्या लेकीच्या म्हणजेच निताराच्या बाबत भावूक होतो. आज २५ सप्टेंबरला निताराचा वाढदिवस आहे अन्‌ बाबा आपल्या लाडक्या लेकीला शुभेच्छा देताना भावूक होणार हे निश्चित…

Akshay Kumar, Emotional Note For Daughter, Nitara, Birthday

अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर आपल्या लेकीसोबत एक अतिशय गोंडस फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये निताराने पप्पांना मिठी मारली आहे अन्‌ पप्पा अक्षयने आपल्या छोट्याशा बाहुलीला डोळे मिटून मिठीत घट्ट धरलं आहे. हा क्षण बाप-लेकीसाठी अतिशय सुखद आहे. आपल्या मुलीचं आपल्यावरील प्रेम तो अनुभवत आहे.

Akshay Kumar, Emotional Note For Daughter, Nitara, Birthday

अक्षयने कॅप्शनमध्ये एक अतिशय भावनिक गोष्ट लिहिली आहे, तो म्हणतो – ‘जगात मुलीच्या घट्ट मिठीपेक्षा मोठा आनंद नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नितारा- मोठी हो, जग जिंकून घे, पण वडिलांसाठी त्यांची मौल्यवान छोटी बाहुली बनून राहा…लव यू.’

Akshay Kumar, Emotional Note For Daughter, Nitara, Birthday

अक्षय कुमारचे चाहतेही या पोस्टवर निताराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत… अक्षय नेहमी निताराच्या वाढदिवसाला असे फोटो आणि भावनिक पोस्ट शेअर करतो!