आता करोनाच्या लढाईत सामाजिक संस्थांकडूनही मदतीच...

आता करोनाच्या लढाईत सामाजिक संस्थांकडूनही मदतीचा हात; मदतीसाठी येथे करा संपर्क (Along With Religious Bodies Lots Of Social Organizations Coming Forward To Help In The War Against The Corona, Emergency Helpline Numbers For Covid Patients)

करोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे देशामध्ये त्याची दहशत निर्माण होत चालली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मुख्यत्वे करोनाच्या रुग्णांची संख्या इतक्या वेगाने वाढत आहे की हॉस्पिटल्समध्ये रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत. ही परिस्थिती पाहता आता मंदिर, मशिद अशा धार्मिक स्थळांनी आपल्या परिसरामध्ये कोविड सेंटर बनविण्यास परवानगी देऊन सहकार्य केले आहेच. शिवाय आता काही सामाजिक संस्थादेखील मदतीसाठी पुढे येत आहेत. हे सर्व लोक निस्वार्थीपणे मानवतेच्या धर्माचं पालन करत या लढाईत सामिल झाले आहेत.

मुंबईच्या नेहरू सेंटरच्या हॉलमध्ये कोविड सेंटर बनवले गेले आहे. येथे रुग्णांसाठी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मुंबईच्या खार जिमखान्यातही कोविड केअर सेंटर उभे केले आहे.

याचबरोबर मुंबईतील लग्नसमारंभासाठीचे अनेक हॉलही आता कोविड सेंटरमध्ये परावर्तीत करण्यात आले आहेत.

मुंबईच्या स्वामी नारायण मंदिराच्या परिसरामध्ये कोविड सेंटर आहे.

नोएडाच्या सेक्टर १८ मधील गुरुद्वारा साहिब यांनी रुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी जे घरी अन्न बनवू शकत नाहीत त्यांना विनामूल्य जेवण देण्याची सोय केली आहे.

वडोदरा येथे स्वामीनारायण मंदिरात ५०० बेडची सोय केलेली आहे.

वडोदरा येथील जहांगीरपुरा मशिदीमध्ये कोविड सेंटर बनवले आहे. येथे ऑक्सिजनसह ५० बेडची सोय केली आहे.

लॉकडाउन दरम्यान सामाजिक संस्थांनी देखील लोकांच्या सेवेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. करोना काळात अनेक सामाजिक संस्थानी गरीबांना जेवण, मास्क आदी विनामूल्य वाटलं आहे. सोबत औषधं माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांची ही मदत अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे.

करोना दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मदत मिळत आहे.

करोना काळामध्ये एकीकडे सोशल मीडियावरून भीती आणि रागाचं वातावरण निर्माण केलं जात आहे, तर दुसरीकडे बरेच लोक मदतीसाठी सोशल मीडियाचाच वापर करत आहेत. आम्ही येथे  पार्ट सोशल मीडियाच्या अशाच काही पोस्ट शेयर करत आहोत. ज्यांची तुम्हाला मदत होऊ शकेल. करोनाच्या उपचाराकरीता तुम्ही या हेल्पलाईन नंबर्सवर संपर्क करू शकता.

महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तींना जर त्यांच्या जवळच्या व्यक्तीला करोनापासून वाचवायचे असेल तर ही ट्वीट तुमची मदत करू शकते.

दिल्लीत प्लाझ्मासाठी तुम्ही येथे संपर्क करू शकता.

या ट्वीटमध्ये तुम्हाला देशातील वेगवेगळ्या राज्यांसाठी मदत मिळू शकते.  

करोनाच्या या संसर्गाच्या कठिण परिस्थितीमध्ये सर्वच धार्मिक स्थळं आणि सामाजिक संस्था आपल्याला मानवतेपेक्षा मोठा दुसरा कोणताच धर्म नाही हीच शिकवण देत आहेत. तुम्हीही आपल्या क्षमतेनुसार करोनाच्या रुग्णांची जरूर मदत करा. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन करोनावर मात करायची आहे.