शाहरुख खानच्या जवान चित्रपटात अल्लू अर्जूनचा नक...

शाहरुख खानच्या जवान चित्रपटात अल्लू अर्जूनचा नकार पण बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन करणार जवानमधून बॉलिवूड पदार्पण (Allu Arjun Refuses To Work In Shah Rukh Khan’s ‘Jawan’, While Bigg Boss 16 Winner MC Stan Will Make His Bollywood Debut With Shahrukh’s Jawan…!)

पठाणच्या अफाट यशानंतर चाहत्यांना शाहरुख खानच्या जवान चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. मध्यंतरी या चित्रपटात पुष्पा फेम दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुन एका छोट्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात होते.

पण ताज्या वृत्तानुसार, अल्लूने या भूमिकेसाठी नकार दिल्याच्या बातम्या येत आहेत त्यामुळे अल्लूला बॉलिवूडमध्ये पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न भंगले आहे. अल्लू अर्जुनने कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात काम केलेले नाही. त्याच्या चाहत्यांना त्याला हिंदी चित्रपटातही पाहायचे आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘पुष्पा द रुल’ या चित्रपटामध्ये खूप व्यस्त आहे. तो आपल्या भूमिकेसाठी आणि लूकसाठी खूप मेहनत घेत आहे. ‘जवान’च्या निर्मात्यांनी अल्लूलाही चित्रपटाची कथा सांगितली होती, पण व्यस्त शेड्यूलमुळे गोष्टी जमून आल्या नाहीत.

दुसरीकडे, जवान या चित्रपटाबाबत आणखी एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ती म्हणजे बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकतो. याआधी स्टॅनने शाहरुख आणि विराट कोहलीला लोकप्रियतेमध्ये मागे टाकले होते, त्यानंतर स्टॅन कपिल शर्मा शोमध्येही दिसला होता. आता स्टॅनला जवानामध्ये काम ऑफर करण्यात आले आहे. या चित्रपटात स्टॅन गाणे गाणार असल्याचेही बोलले जात आहे. परंतू, या विषयावर निर्माते किंवा स्टॅनकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

चित्रपटाचा मोठा भाग महाराष्ट्रात चित्रित करण्यात आला असून त्यात पुण्याची मेट्रोही दाखवण्यात आली आहे. पुण्यात स्टॅनची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे, त्यामुळे चित्रपटाचा संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर स्टॅनच्या रॅप टॅलेंटचा वापर चित्रपटात करू शकतो, असे मानले जाते.

जवान या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, तो 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होत आहे, या चित्रपटात साऊथची सुपरस्टार नयनतारा आणि विजय सेतुपती देखील दिसणार आहेत.