आलिया झाली निलाजरी, दाखविली आपली लाँजरी, चाहत्य...

आलिया झाली निलाजरी, दाखविली आपली लाँजरी, चाहत्यांची मात्र नाराजी (Aliyah kashyap Shares Pics in Lingerie; Fans Troll Aliyah)

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची होनहार (?) बेटी आलिया कश्यप आपल्या बोल्ड छायाचित्रांनी सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवत असते. पण या खेपेला तिचा अंदाज सपशेल चुकला आहे. कारण तिनं यावेळी जे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंट वर टाकलेत, त्याची तारीफ चाहत्यांनी केलेली नाही. उलट तिच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आलियाने लॉन्जरीचे फोटो प्रदर्शित केले आहेत. या तरुण, होतकरू अभिनेत्रीचे अंतर्वस्त्रातील फोटो तिच्या चाहत्यांना अजिबात रुचले नसून त्यांनी वाईटप्रकारे टिका केली आहे.

फोटो सौजन्य :इंस्टाग्राम

आलियाने आपली अंतर्वस्त्रे दाखविणारी छायाचित्रे पोस्ट करताच लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. एक चाहता म्हणाला,”तू एक भारतीय नारी आहेस. अशा प्रकारे अंगप्रदर्शन करणं तुला शोभत नाही मॅडम.”

फोटो सौजन्य :इंस्टाग्राम

विशेष म्हणजे या नाराज प्रतिक्रिया आलियाने मनावर घेतलेल्या दिसत नाहीत. कारण तिनं यापूर्वी देखील आपली अंडरगार्मेन्ट्‌स घातलेली छायाचित्रे पोस्ट केली होती. तेव्हा देखील नाराजी व्यक्त झाली होती. मात्र या खेपेस तिनं जी छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत, त्यामध्ये तिनं आपल्या लॉन्जरीचं जरा ज्यादाच प्रदर्शन केलं आहे.

फोटो सौजन्य :इंस्टाग्राम

फोटो सौजन्य :इंस्टाग्राम

फोटो सौजन्य :इंस्टाग्राम

आलिया ही अनुराग कश्यप यांची पहिली बायको आरती बजाज हिची मुलगी आहे. अनुराग व आरती २००९ साली विभक्त झाले आहेत. आलियाच्या या निलाजरेपणावर अनुराग सावध प्रतिक्रिया देतात. ते म्हणतात की, आलिया तरुण आहे. ती स्वतः आपले निर्णय घेऊ शकते. आलियाने अद्याप बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेला नाही, पण अनुरागनी स्पष्टपणे सांगितलं की, या इंडस्ट्रीत प्रवेश मिळविण्यासाठी तिला बराच स्ट्रगल करावा लागेल. आलिया ही अनुरागची मुलगी असल्याने तिला काही बाबतीत सूट मिळेल, असे त्यांच्या बोलण्यावरून तरी वाटत नाही.