मालदिवच्या समुद्रातले आलिया भट्टचे आग लावणारे फ...

मालदिवच्या समुद्रातले आलिया भट्टचे आग लावणारे फोटो (Alia Bhatt’s Maldives Pics Set Internet On Fire, Actress Shares Bikini Photos With Girl Gang)

शुटिंगच्या व्यस्त कार्यक्रमातून सुट्टी घेऊन आलिया भट्ट, आपली बहीण शाहीन भट्ट आणि आकांक्षा रंजन कपूर या आपल्या मैत्रिणीला घेऊन मालदिवच्या रम्य समुद्रकिनारी पोहचली आहे. तिथे त्या मौजमस्ती करताहेत. अन्‌ त्याचे फोटो व व्हिडिओज्‌ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
मालदिवला पोहचल्यानंतर आलिया आपल्या गर्ल गँगसह, सतत आपले मौजमस्तीचे फोटो शेअर करीत आहे. आलिया भट्टने बहीण शाहीन व मैत्रिण आकांक्षा रंजन कपूर यांच्यासह स्वीमिंग पूलमध्ये वाईन घेत आपली डिनर डेट आणि चिलींग सेशनचे फोटो शेअर केलेत.

शाहीनने इन्स्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर करत म्हटलं आहे की, मी आलियासह डिनर डेट वर आहे.

बेस्ट फ्रेंड फॉरएव्हरसह आलिया भट्ट मालदिवमध्ये व्हेकेशनवर.
संजय लीला भन्साली यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या बिझी शूटिंग शेड्यूलमधून एक छोटासा ब्रेक घेतला अन्‌ शाहीन व आकांक्षासह मालदिवला उड्डाण केले.

आकांक्षा आणि शाहीन भट्ट मालदिवच्या समुद्रात खूप मस्ती करताहेत. त्यामध्ये या तरुण मुली स्वीमिंग पूलमध्ये उभे राहून थंडावा अनुभवताहेत.

शाहीन भट्टने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये या दोघींचे फक्त पाय दिसताहेत. रिसॉर्टच्या आसपास असलेल्या गोल्फ कार्टमध्ये राईड करीत आहेत.

चला बघूयात, आलिया भट्टच्या मालदिव सुट्टीचे काही फोटो –

आलिया भट्टने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर मालदिवच्या समुद्रकिनारी बिकिनी घालून बागडत असलेले फोटो प्रदर्शित केले. त्यावर कॅप्शन दिली, ‘ब्लू वॉटर ॲन्ड पाईसीज्‌’

बिकिनी घातलेल्या आलियाच्या फोटोवर तिची आई सोनी राझदानने कॉमेंट दिली, ”हॅलो लिट्‌ल फिशी”

आलियाने आपल्या इन्स्टाग्रामवर आकांक्षा बरोबर काढलेली एक सेल्फी पोस्ट केली. त्यात तिनं लिहिलं,” हँग वुईथ ए हनी”

याआधी नवीन वर्ष साजरं करण्यासाठी आलिया आपला बॉय फ्रेंड रणबीर कपूर बरोबर रणथंभोरला गेली होती.

राजस्थानातील रणथंभोरला ती रणबीर कपूर व त्याच्या कुटुंबियांना घेऊन नववर्ष साजरं करण्यासाठी गेली होती. निसर्गाच्या सान्निध्यात तिनं नवीन वर्षाचं स्वागत केलं होतं. टायगर सफारीसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यातील सहलीचे फोटो व व्हिडिओज्‌ इंटरनेटवर प्रसिद्ध केले होते. या ठिकाणी त्यांना दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंह देखील भेटले होते. ते लोक पण नवीन वर्षाच्या स्वागताला तिथेच गेले होते.

आलियाच्या अभिनय कारकिर्दीबाबत बोलायचं तर, ती भन्साली यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ करते आहे. शिवाय अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ हा तिचा आणखी एक चित्रपट तयार होतोय्‌. त्यामध्ये आलिया रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिसेल.