हॉट बॉडीकॉन ड्रेस मध्ये बेबीबंप फ्लॉन्ट करताना ...

हॉट बॉडीकॉन ड्रेस मध्ये बेबीबंप फ्लॉन्ट करताना दिसली आलिया भट्ट (Alia Bhatt’s Latest Look Is All About Flaunting Her Baby Bump In A Hot Bodycon Dress)

बॉलिवूड कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या घरी लवकरच लहानग्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. प्रेग्नंट असूनही आलिया तिच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासोबतच आलिया भट्टची मॅटर्निटी फॅशनही गरोदर महिलांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. अलीकडेच आलिया भट्टचा बॉडीकॉन ड्रेसमधील लेटेस्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अलीकडेच, आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवर हॉट बॉडीकॉन ड्रेसमधील तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये, आलिया रिब्ड रस्टेड ऑरेंज कलरचा हाय थाई स्लिट बॉडीकॉन ड्रेस परिधान करून बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

अगदी साध्या लूकमध्ये आलियाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, गरोदरपणातही मॅटर्निटी फॅशन स्वीकारून स्टाईल स्टेटमेंट बनू शकते.

याआधीही आलियाने दिल्लीतील ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये तिच्या मॅटर्निटी स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली होती.

माहितीसाठी, आलियाने या वर्षी जूनमध्येच सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची बातमी जाहीर केली होती.

तिने दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर संगणकावर आपल्या बाळाचा सोनोग्राफी रिपोर्ट पाहताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये सिंह आणि सिंहिणी दिसत आहेत.