आलिया भटट्च्या आजोबांनी कधीच तिच्या आजीशी लग्न ...

आलिया भटट्च्या आजोबांनी कधीच तिच्या आजीशी लग्न केले नव्हते (Alia Bhatt’s Grandfather Never Married Her Grandmother, The Reason Is Shocking)

आलिया भट्ट हे आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव आहे. आलिया भट्टने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी ती केवळ भट्ट कुटुंबाची मुलगी म्हणून ओळखली जात होती. चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची मुलगी. सिनेइंडस्ट्रीत आलियाचे कुटुंब खूप लोकप्रिय आहे. आलियाच्या चाहत्यांना तिच्याशी संबंधित सर्व काही माहित असेल, परंतु फार कमी लोकांना माहित आहे की आलियाचे वडील महेश भट्ट यांच्या पालकांनी कधीही लग्न केले नव्हते.

आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांच्या वडिलांचे नाव नानाभाई भट्ट आणि आईचे नाव शिरीन मोहम्मद अली होते.  नानाभाई भट्ट हे गुजराती ब्राह्मण होते आणि आई शिरीन मोहम्मद अली गुजराती शिया मुस्लिम होत्या. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि शिरीन गरोदर राहिल्या, पण महेश भट्टच्या वडिलांना त्यांचे आधीच लग्न झाले असल्यामुळे इच्छा असूनही शिरीनशी लग्न करता आले नाही.  पण शिरीनने कोणतीही पर्वा न करता महेश भट्टला जन्म दिला आणि त्यानंतर मुकेश भट्ट यांचाही जन्म झाला. शिरीन-नानाभाई यांचे नाते पहिली पत्नी हेमलता यांच्या कुटुंबाला मान्य नव्हते, त्यामुळे नानाभाई भट्ट यांची दोन कुटुंबे, दोन घरे होती.

आलियाच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल बोलायचे झाल्यास तिचे काश्मीर आणि जर्मनीशी देखील संबंध आहेत. आलियाच्या आईच्या आईचे नाव गर्ट्रूड होल्झर आहे तर आजोबा नरेंद्रनाथ राजदान हे काश्मिरी पंडित आहेत. भिन्न संस्कृतीचे असूनही, दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आलियाची आई सोनी राजदानचा जन्म झाला. आपल्या वडिलांमुळे भारताच्या मातीशी असलेल्या ओढीने  सोनी राजदानला मुंबईत परतण्यास भाग पाडले, तिथेच त्यांची महेश भट्टसोबत ओळख झाली आणि दोघांनी लग्न केले.

आलियाच्या वडिलांचे वैयक्तिक जीवन खूप लोकप्रिय आहे. महेश भट्ट यांचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर होते, पण त्यांनी १९६८ मध्ये लॉरेनब्राइट ( बदललेले नाव किरण) या ब्रिटीश महिलेशी लग्न केले. ती त्यांचे पहिले प्रेम होती. लग्नानंतर महेश भट्ट यांना पहिली मुलगी पूजा भट्ट झाली. त्यानंतर राहुल भट्टचा जन्म झाला. पुढे किरणपासून वेगळे झाल्यानंतर महेश भट्ट ‘सारांश’ चित्रपटाच्या सेटवर सोनी राजदानला भेटले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि सुमारे दोन वर्षे दोघांनी गुपचूप एकमेकांना डेट केले. त्यांचे आधीच एक लग्न झाल्यामुळे अनेक अडचणी आल्या पण प्रेमापुढे कोणाचे काहीच चालले नाही. 20 एप्रिल 1986 ला दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोघांना शाहीन भट्ट आणि आलिया भट्ट या दोन मुली झाल्या.

अनेक वर्षे डेट केल्यानंतर आलिया भट्टने 14 एप्रिल 2022 ला अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न केले. लग्नानंतर लगेचच या जोडप्याने ते आईबाबा होणार असल्याची आनंदाची बातमी शेअर केली.