आलिया भट्टची डिलेव्हरी डेट आली समोर, नोव्हेंबर ...

आलिया भट्टची डिलेव्हरी डेट आली समोर, नोव्हेंबर महिन्यात जन्माला येणार कपूर खानदानाचे बाळ (Alia Bhatt’s delivery date revealed, Ranbir Kapoor- Alia Bhatt to welcome their baby in November)

आलिया भट्ट सध्या आपल्या गरोदरपणाचा काळ एन्जॉय करत आहे. अभिनेत्री सध्या प्रसूती रजेवर असून विश्रांती घेत आहे. सध्या संपूर्ण कपूर कुटुंब बाळाच्या स्वागताची तयारी करत आहे. कपूर कुटुंब येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी खूप उत्सुक आहे. चाहतेसुद्धा आलिया आई होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आलियाने आपल्या प्रसूतीसाठी मुंबईच्या एचएनला हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवल्याचे समोर आले आहे. आता अभिनेत्रीच्या प्रसूतीची तारीखही समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आलिया नोव्हेंबर महिन्यात आई होऊ शकते. नक्की तारीख कोणती ते अजून समजलेले नाही. पण सोनोग्राफीमध्ये आलियाची प्रसुती तारीख 28 नोव्हेंबर असल्याचे लिहिले असल्याचे म्हटले जात आहे. पण डॉक्टरांच्या मते ती 20 ते 30 नोव्हेंबरमध्ये कधीही आई होऊ शकते.

आलियाच्या होणाऱ्या बाळाचा आणि तिची बहिण शाहीन भट्टचा खास संबध असल्याचे देखील म्हटले जाते. कारण शाहीनचा वाढदिवससुद्धा 28 नोव्हेंबरलाच आहे. जर आलियाचे बाळ 28 नोव्हेंबरला झाले तर शाहीन आणि बाळाची रास एकच असेल तसेच दोन्ही कुटुंबांमध्ये डबल सेलिब्रेशन होईल.

आलियाची डिलिव्हरी डेट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा आलिया लग्नाआधीच गरोदर होती. त्यामुळेच तिने घाईघाईत लग्न केले अशी चर्चा होत आहे. 14 एप्रिल 2022 रोजी आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न झाले होते, त्यानुसार त्यांच्या लग्नापासून त्यांच्या डिलेव्हरीच्या तारखेपर्यंत फक्त 7 महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे आलिया लग्नाआधीच गरोदर असल्याचा तर्क लोक लावत आहेत.

काही दिवसांपूर्वीच आलियाने संपूर्ण कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली, त्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. याआधी आलियाची आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर यांनीही आलियासाठी ग्रँड बेबी शॉवर पार्टी आयोजित केली होती, त्यावेळी आलिया रणबीरसोबत पूजा करताना दिसली होती.