आलिया भट्ट झाली करोना मुक्त, चाहत्यांनी केला आन...

आलिया भट्ट झाली करोना मुक्त, चाहत्यांनी केला आनंद व्यक्त (Alia Bhatt’s Corona Test Negative; Fans Express Happiness)

अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर आपला फोटो शेअर करत, ती करोनामुक्त झाली असल्याचे सांगितले आहे. तिचा करोनाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी आलियाला करोनाची लागण झाली होती, ज्यामुळे ती घरीच क्वारंटाईन झाली होती. परंतु आता तिची करोना चाचणी निगेटीव्ह आल्यामुळे तिला हायसे वाटले आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

आपला सनकिस्ड फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत आलिया भट्ट लिहिते,’ पहिल्यांदा निगेटीव्ह लिहिताना खूप छान वाटतंय.’ आलिया भट्टचा करोनाचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे तिचे चाहतेही खूप आनंदी आहेत. आलियाला करोनाची लागण झाल्यापासून तिने स्वतःला घरीच बंदिस्त केले होते. परंतु, या दरम्यान देखील आलिया सोशल मीडियावर सक्रीय होती आणि आपले आराम करतानाचे फोटो पोस्ट करत होती. 

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

आलिया भट्ट आता बरी आहे परंतु मुंबईत लॉकडाऊन लागल्यामुळे अनेक चित्रपटांचे शूटिंग थांबले आहे. आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाचं चित्रिकरणंही बाकी आहे. आता लॉकडाऊन संपल्यानंतरच आलिया चित्रिकरणास जाऊ शकेल. आगामी ‘आरआरआर’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ अशा चित्रपटांमधे आलिया दिसणार आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामध्ये आलिया, रणबीर कपूर सोबत दिसेल. तर ‘आरआरआर’ या चित्रपटापासून आलिया भट्ट साउथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटामध्ये आलिया अतिशय मह्त्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटामध्ये तिच्या सोबत अजय देवगन,  ज्युनियर एनटीआर आणि रामचरण आदी कलाकारही असतील.