आलिया भट्टचे ‘आलू’, शिल्पा शेट्टीचे...

आलिया भट्टचे ‘आलू’, शिल्पा शेट्टीचे ‘मुनकी’ तर वरुण धवनचे टोपण नाव आहे ‘पप्पू’; यासारख्या अनेक स्टार्सची मजेदार टोपण नावे जाणून घेऊया (Alia Bhatt’s Aloo, Shilpa ‘Munki’ And Varun Dhawan ‘Pappu’ Know Funny Nicknames Of Your Favourite Stars)

पाळण्यातले नाव काहीही ठेवले असले तरी आपण मुलांना लाडाने काही वेगळ्या नावाने हाक मारतो. मग घरामध्ये तेच नाव त्याला चिकटते. अन्‌ ते त्याचे टोपण नाव होते. बॉलिवूडचे स्टार्स याला अपवाद नाहीत. त्यांच्या असली नावापेक्षा त्यांची घरातल्यांनी ठेवलेली टोपण नावे मजेदार आहेत. पाहूया आपल्या आवडत्या कलाकारांची ही टोपण नावे.

बॉलिवूडची तरुण अभिनेत्री आलिया भट्टला तिच्या घरचे लोक आणि जवळचे मित्र तिला ‘आलू’ नावाने हाक मारतात. आलियाने स्वतःच सांगितलं आहे की, ती लहानपणी चांगलीच गोल गरगरीत होती, म्हणून घराच्या लोकांनी ‘आलू’ म्हणायला सुरुवात केली.

अभिषेक बच्चनने, प्रियंका चोप्राचे नाव ‘पिगी चॉप्स’ असं ठेवलं आहे. पण तिची टोपण नावे मिमी आणि मिठ्ठू अशी आहेत. पीसी आणि सनशाईन अशीही नावे तिला काही निकटवर्तीयांनी ठेवली आहेत.

रणबीर कपूरला, त्याचे आजोबा ‘गंग्लू’ म्हणत असत. त्याचे काही मित्र ‘डब्बू’ नावाने पुकारतात. त्याची आई, नितू सिंह त्याला ‘रेमंड’ म्हणते. ‘रेमंड’ या कापडाची टॅगलाईन आहे ‘रेमंड – द कम्प्लीट मॅन’. यावरून नितूने रणबीरला रेमंड नाव दिले आहे. कारण आपला लाडका लेक रणबीर हा कम्प्लीट मॅन आहे, अशी तिची समजूत आहे.

करीना कपूरला तिचे घरवाले आणि मित्रपरिवार ‘बेबो’ म्हणतात. ‘कम्बख्त इश्क’ या चित्रपटात या नावावरून एक गाणं तयार केलं गेलं होतं. ते चांगलंच लोकप्रिय झालं होतं.

फिट ॲन्ड फाईन असलेल्या शिल्पा शेट्टीला तिचे कुटुंबिय व मित्र अनेक वेगळ्या नावांनी हाक मारतात. पण तिचं टोपण नाव आहे ‘मुनकी’. जे अतिशय गोड आहे.

तरुण पिढीचा आवडता कलाकार वरुण धवन याचं टोपण नाव ‘पप्पू’ आहे. एका रिॲलिटी शो मध्ये खुद्द वरुणनेच सांगितलं होतं की आपल्या घरातील सगळे जण त्याला ‘पप्पू’ म्हणतात.

फारच कमी लोकांना ठाऊक असेल की, अनुष्का शर्माच्या घरच्या लोकांनी, मोठ्या प्रेमाने तिचं नाव ‘नुशेश्वर’ ठेवलं होतं. त्याचा शॉर्टकट बनून ‘नुशी’ असं तिचं टोपण नाव झालं. विराट कोहली तिला याच नावाने हाक मारतो.

माधुरी दीक्षितला तिचे कुटुंबिय आणि नजीकच्या मैत्रिणी ‘बबली’ नावाने संबोधतात.

अजय देवगणला, त्याची आई ‘राजू’ म्हणते. तर बायको काजोल ‘जे’ एवढंच म्हणते.

सदैव कुरापती काढणाऱ्या कंगना रणौतला सोशल मीडियावर, लोकांनी अनेक नावे ठेवली आहेत. पण प्रत्यक्षात मात्र ‘अर्शद’ हे तिचं टोपण नाव आहे. सच्चा आणि भक्त असा त्याचा अर्थ आहे.

अक्षयकुमारचं मूळ नाव राजीव भाटिया आहे. त्यावरून घरातील मंडळी व जवळचे दोस्त त्याला ‘राजू’ म्हणतात. तर फिल्म इंडस्ट्रीतील लोक त्याला ‘अक्की’ म्हणतात.

ऐश्वर्या रायला, तिच्या चाहत्यांनी ‘ऐश’ असं नाव दिलं आहे. पण लहानपणापासून तिचे आई-वडिल, तिला ‘गुल्लू’ नावाने हाक मारतात.

सुश्मिता सेनला काही लोक ‘शुष’ बोलतात. पण तिचे मित्र ‘टीटू’ म्हणतात.

हृतिक रोशनचं टोपण नाव ‘डुग्गू’ आहे. हे नाव त्याच्या आजीने ठेवलं आहे.

‘जिराफ’ हे सोनम कपूरचं टोपण नाव आहे. ती उंचाडी असल्याने, तिचे पप्पा अनिल कपूरने हे नाव दिलं आहे.

शाहीद कपूरला घरची माणसं ‘साशा’ नावाने हाक मारतात. हे नाव त्याच्या मम्मी-पप्पांनी ठेवलं आहे.

हॉट आणि सेक्सी बिपाशा बसुचं टोपण नाव ‘बोनी’ आहे. तिचे जवळचे मित्र तिला ‘बिप्स’ म्हणतात.’