आलियाने हळदीचा फोटो शेअर करत सासू नीतू कपूर यां...

आलियाने हळदीचा फोटो शेअर करत सासू नीतू कपूर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Alia Bhatt Wishes ‘Soon to be Dadi’ Neetu Kapoor On Her Birthday, Shares Unseen Picture From Her Haldi Ceremony)

रणबीर कपूरची आई आणि आलिया भट्टची सासू अभिनेत्री नीतू कपूर आज आपला ६४वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त आज त्यांचे चाहते तसेच बॉलिवूड सेलिब्रेटीही त्यांना अनेक शुभेच्छा देत आहेत. या सगळ्यांसोबतच नीतू यांची सून आलिया भट्टनेही तिच्या लाडक्या सासूला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाची ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा आणि तिच्या सासूचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो आलिया आणि रणबीरच्या हळदीचा आहे. फोटोत नीतू कपूर आलियाचे प्रेमाने कपाळावर चुंबन घेताना दिसते आहे.

या फोटोसोबत आलियाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिले आहे की, सर्वात सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा… माझी सासू, मैत्रिण आणि लवकरच होणारी आजीही… खूप प्रेम …” नीतू कपूर यांनी सुद्धा आलियाची ही प्रेमळ पोस्ट त्यांच्या अकाउंटवर शेअर करत त्यावर ‘लव्ह यू सो मच…’ असे लिहिले आहे.

आलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहतेही सासू-सूनेमधलं हे प्रेमळ नातं पाहून आलियाचे कौतुक करत आहेत.

आलिया अनेकदा तिच्या सासूसोबतचे फोटो शेअर करत असते. या सासू-सूनेमधील बाँडिंग एकदम जबरदस्त आहे. नीतू कपूरही उघडपणे आलियावर प्रेम व्यक्त करत असतात आणि मीडिया समोर सूनेचे कौतुक करत असतात. नीतू यांचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिल्यास त्या अनेकदा आलियासोबतचे फोटो शेअर करतात.

आलियाचा वाढदिवस असो किंवा तिचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होत असो, नीतू कपूर आपल्या सूनेला शुभेच्छा द्यायला विसरत नाहीत. आलिया सध्या तिच्या शूटिंगसाठी लंडनला गेलेली असल्यामुळे नीतू कपूर सुद्धा त्यांच्या कुटुंबासोबत लंडनमध्येच वाढदिवस साजरा करणार आहेत.