आलिया भट्ट आपल्या मुलीला ठेवणार मीडियापासून दूर...

आलिया भट्ट आपल्या मुलीला ठेवणार मीडियापासून दूर, अभिनेत्रीने सांगितले कारण (Alia Bhatt Will Keep Her Daughter Away From The Camera, The Actress Told The Reason Behind It)

आलिया भट्टने 6 नोव्हेंबर 2022 रोजी मुलीला जन्म दिला. त्यामुळे सध्या ती आपल्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. सेलिब्रेटींच्या घरी मुलं जन्माला आली की मीडियावाले त्या नवजात बाळाचे फोटो घेण्यासाठी नुसते झटत असतात. त्यामुळे लहानवयातच हे स्टारकिड्स प्रकाशझोतात येतात.  अशा परिस्थितीत आलियाने आपल्या मुलीसाठी काही खास प्लानिंग केले आहे.

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान आलिया भट्टने सांगितले होते की, मी माझ्या मुलीचे संगोपन अगदी सामान्य वातावरणात करणार आहे. तिला लोकांच्या नजरेपासून दूर ठेवणार आहे. मला तिच्या संगोपनाची खूप काळजी वाटते. याबाबत मी नेहमीच माझ्या कुटुंबाशी चर्चा करत असते. माझ्या मुलीने लाईट आणि कॅमेऱ्यामध्ये मोठे व्हावे अशी माझी इच्छा नाही.

आलियाला विचारण्यात आले की , जर तुझ्या मुलीने अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तर त्यावर तुझी प्रतिक्रिया काय असेल ? या प्रश्नाचे उत्तर देताना आलिया म्हणाली की, मला आतापासून कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही, उद्या ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर त्याचे खूप वाईट वाटेल. मी स्वतःसाठी प्रसिद्धीचा मार्ग निवडला, त्यामुळे उद्या माझ्या मुलीनेही हाच मार्ग निवडावा असे नाही.

14 एप्रिल 2022 रोजी आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न झाले. लग्नापूर्वी दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले होते. मुलीला जन्म दिल्यानंतर आलिया भट्टने काही काळ कामातून ब्रेक घेतला आहे. तिचा आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.