आलिया भट्ट कपूर खानदानाच्या बाळाला या हॉस्पिटलम...

आलिया भट्ट कपूर खानदानाच्या बाळाला या हॉस्पिटलमध्ये देणार जन्म (Alia Bhatt Will Give Birth To A New Member Of Kapoor Family In This Hospital, Connection With Father-In-Law Rishi Kapoor)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. गर्भवती असूनही, आलिया सध्या आपल्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त आहे. या वर्षी जूनमध्ये लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच तिने सोशल मीडियावर आपल्या गरोदरपणाची घोषणा केली होती.

आलिया नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाळाला जन्म देऊ शकते. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, कपूर कुटुंबाच्या अगदी जवळच्या सूत्राने सांगितले की, आलिया भट्टने गिरगाव (मुंबई) येथील एचएन हॉस्पिटलमध्ये आपले नाव नोंदवले आहे. 

आलियाने प्रसूतीसाठी ज्या हॉस्पिटलमध्ये आपले नाव नोंदवले आहे त्या हॉस्पिटलशी तिचे दिवंगत सासरे ऋषी कपूर यांचा खास संबंध आहे. आजारपणाच्या शेवटच्या दिवसांत ऋषी कपूर यांची प्रकृती खालावली तेव्हा त्यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांनी येथेच अखेरचा श्वास घेतला होता.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी एप्रिलमध्ये विवाहबद्ध झाले. आणि लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने सोशल मीडियावर आपल्या गरोदरपणाची घोषणा केली.

सोनोग्राफी करतानाचा एक फोटो आलियाने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावेळी तिच्या शेजारी रणबीर कपूर सुद्धा होता. या फोटोलो तिने आमचे बाळ लवकरच येत आहे असे कॅप्शन दिले होते.