आलियाने रणबीरचा ब्लेझर चोरून हुशारीने लपवला आपल...

आलियाने रणबीरचा ब्लेझर चोरून हुशारीने लपवला आपला बेबी बंप (Alia Bhatt ‘steals’ husband Ranbir Kapoor’s blazer, Smartly hides baby bump in Sequinned-Blazer look)

अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न झाल्यावर आलिया भट्टने काही दिवसांत ती गरोदर असल्याची गोड बातमी सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना दिली होती. आलिया सध्या तिचे गरोदरपणाचे दिवस खूप मजेत घालवत आहे. काही दिवसांपूर्वीच आलिया तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे शूट संपवून लंडनहून मुंबईला परतली.

मुंबईत येताच तिने तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. आलिया सध्या तिच्या डार्लिंग चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचे तेज स्पष्ट दिसत आहे. ती वेगवेगळ्या इव्हेंटला स्टाइलिश लूकमध्ये उपस्थित राहते.

पण स्टाइल करताना आपले बेबी बंप कसे लपेल याचा विचार ती करत आहे आणि त्याच प्रकारे कपड्यांची निवडही करत आहे. आलिया नुकतीच डार्लिंग चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली असताना तिने रणबीरचा ब्लेझर चोरला होता. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या काही नव्या लूकचे फोटो पोस्ट केले. त्या फोटोंना कॅप्शन देत तिने लिहिले की, जेव्हा नवरा बाहेर जातो, तेव्हा मी माझा लूक पूर्ण करण्यासाठी त्याचा ब्लेझर चोरते.  थॅंक्यू माय डार्लिंग्स.

आलियाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला असून ते त्यावर मजेशीर कमेंटही करत आहेत. अनेक सेलिब्रेटींनीही या पोस्टला लाइक आणि कमेंट केली आहे. आलियाची आई सोनी राजदानने यावर हार्टचा इमोजी कमेंट केला आहे तर तिच्या एका चाहत्याने , तर काय झाले रणबीरने तर तुझं मनं चोरलं आहे अशी कमेंट केलेली पाहायला मिळते.

आलिया आणि रणबीर लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. आलियाने जून महिन्यात सोनोग्राफी करतानाचा फोटो शेअर करत ती गरोदर असल्याची बातमी  दिली होती.