आलिया भट्टने शेअर केला बेबीमूनचा सेल्फी , सोनम ...

आलिया भट्टने शेअर केला बेबीमूनचा सेल्फी , सोनम कपूरने कमेंट करत केला लोकेशनचा खुलासा (Alia Bhatt Shares Sun-Kissed Selfie From Her Babymoon, Sonam Kapoor Says, ‘I Went There Too… Have Fun’)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आई-वडील होणार आहेत. आलिया आपल्या गरोदरपणाचा काळ काम करत खूप आनंदात घालवत आहे. अलीकडेच, अभिनेत्री ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनसाठी रणबीरसोबत दिसली होती. त्यानंतर दोघांनी जोडीने फोटो क्लिक केले. आलियाने शॉर्ट ड्रेस घातला होता ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत होती.

त्यानंतर दोघे काही दिवसांनी एकत्र विमानतळावर दिसले. पण त्यावेळी ते नक्की कुठे जात आहेत ते समजले नव्हते. आज आलियाने एका ठिकाणाहून आपला सन किस्डवाला सेल्फी शेअर केला. तिचा तो फोटो खूप व्हायरल होत आहे.  आलियाने त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, या सूर्यप्रकाशासाठी कृतज्ञ… खूप प्रेमासाठी धन्यवाद… या फोटोमध्ये आलियाच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचे तेज स्पष्टपणे दिसत आहे.

चाहते आणि सेलिब्रिटी या फोटोवर भरपूर कमेंट करत आहेत. पण या सगळ्यात अभिनेत्री सोनम कपूरच्या कमेंटने लक्ष वेधून घेतले. कारण सोनमने कमेंटमधून आलिया नक्की कुठे गेली आहे त्या ठिकाणाचा खुलासा केला आहे.

सोनमने लिहिले की, मी माझ्याही बेबीमूनसाठी तिथे गेले होते. हे खूप छान आहे. मजा करा. अभिनेत्री सोनम कपूर देखील लवकरच आई होणार आहे .ती देखील तिच्या बेबीमूनसाठी इटलीला गेली होती आणि आता, आलिया आणि रणबीर देखील इटलीला गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आलिया आणि रणबीर एकमेकांसोबत वेळ घालण्यासाठी आपापल्या कामातून वेळ काढत आठवडाभरासाठी इटलीला गेले आहेत.

आलियाने पोस्ट केलेल्या फोटोवर अनेकजण कमेंट आणि लाइक्स करत आहेत. आलियाच्या सासूबाईंनी या फोटोवर माय ब्यूटी अशी कमेंट केली आहे.