आलियाने लंडन येथून बेडवर झोपून शेअर केला फोटो, ...

आलियाने लंडन येथून बेडवर झोपून शेअर केला फोटो, म्हणते ‘खूप थकली आहे तरी पण खूप खुश आहे’(Alia Bhatt shares new pic from London, Writes ‘So tired but so happy’)

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आलिया आणि रणबीरचा ऑनस्क्रीन रोमान्स पाहण्यास प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादामुळे चित्रपटाची संपूर्ण टीम खुश आहे. अभिनेत्री आलिया भट्टने सुद्धा लंडनमधून एक फोटो शेअर करत तिचा आनंद व्यक्त केला आहे. सोबतच तिने ती खूप थकल्याचे सुद्धा सांगितले.

आलिया सध्या तिचा हॉलिवूडमधील पहिला चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आलिया तिथले फोटो सतत शेअर करत असते. आता पुन्हा एकदा आलियाने लंडनमधून एक फोटो शेअर केला आहे.

हा फोटो आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून शे्अर केला. त्या फोटोत आलिया नो मेकअप लूकमध्ये बेडवर झोपून पोज देत आहे. पोस्ट केलेल्या फोटोत ती खूप थकलेली दिसते. या फोटोला आलियाने “हार्ट ऑफ स्टोनच्या शूटिंगचा आणखी एक छान दिवस , खूप थकली आहे पण ब्रम्हास्त्रला तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे खूप खुश आहे. सगळा थकवा आणि त्रास या प्रेमामुळे निघून जातो. तुम्हा सगळ्यांना भरपूर प्रेम. असे कॅप्शन दिले आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित रणबीर आणि आलिया मुख्य भूमिकेत असलेला ब्रम्हास्त्र या चित्रपटाचा ट्रेलर 2 दिवसांपूर्वीच रिलीज झाला. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची चित्रपटाबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम खुश आहे. ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसाद पाहून अयान मुखर्जी यांनी एक इमोशनल नोट लिहून चाहत्यांचे आभार मानले. आता आलियाने लंडनमधून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.