आपल्या हॉलिवूडच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक आलिया ...

आपल्या हॉलिवूडच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक आलिया भट्टने सादर केला : चाहते म्हणाले – ‘भारतीय सिनेमाचा गौरव’ (Alia Bhatt Shares First Look Of Hollywood Film ‘Heart Of Stone’, Fans Says ‘Pride Of Indian Cinema’)

‘हार्ट ऑफ स्टोन’ या आपल्या हॉलिवूड चित्रपटाचा फर्स्ट लूक आलिया भट्टने सोशल मीडियावर सादर केला आहे. तो पाहून चाहत्यांनी तिची तारीफ करत ‘भारतीय सिनेमाचा गौरव’ अशी प्रशस्ती तिला दिली आहे.

बॉलिवूडमध्ये गाजलेली आलिया भट्ट आता हॉलिवूड चित्रसृष्टीत पदार्पण करती झाली आहे. या स्पाय थ्रिलर अर्थात्‌ गुप्तहेर पटात आलिया सोबत गेल गॅडोट आणि जेमी डॉर्नन हे कलाकार आहेत. हा गुप्तहेर पट २०२३ साली नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

‘हार्ट ऑफ स्टोन’ चा हा फर्स्ट लूक त्यांनी यु ट्युब चॅनल वरून प्रसारित केला आहे. त्यानंतर आलिया भट्टने तो आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आलियाच्या या वेगळ्या लूकवर चाहत्यांनी कमेंटस्‌ द्यायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर यु ट्युब व्हिडिओच्या कमेंटस्‌ विभागात आलियाची प्रशंसा केली.

आलियाची आई सोनी राजदानने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. अर्जुन कपूरने दिलं की, ही अभिमानास्पद कामगिरी आहे.

या व्हिडिओवर चाहत्यांनी खुल्या दिलाने प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘अभिनंदन… आलिया. तू भारतीय सिनेमाचा अभिमान आहेस,’ असं एकाने म्हटलं तर दुसरा म्हणतो – ‘मी स्वप्न बघतोय्‌ असं वाटतंय्‌.’