आलियाची घोषणाः कॅन्सर झालेल्या मुलांना रणबीर कप...

आलियाची घोषणाः कॅन्सर झालेल्या मुलांना रणबीर कपूर, कपडे विकून मदत करणार (Alia Bhatt Reveals, Ranbir Kapoor is Sharing his Wardrobe For Charity: The Sale Would Benefit Children Fighting Cancer)

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडची सर्वात आवडती जोडी आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अन् आता ते असं छान काम करायला निघालेत की, चाहते त्यांच्या अधिकच प्रेमात पडतील.

त्याचं कारण असं की, आज ९ फेब्रुवारी पासून रणबीर कपूरने आपले फॅशनेबल कपडे विकायला काढले आहेत. ही घोषणा त्याची प्रेयसी आलिया भट्टने सोशल मीडियावर केली आहे.

रणबीर आपल्या वॉर्डरोबमधील वस्तुंची विक्री सुरू करतो आहे, असं आलियाने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये लिहिलं आहे. या वस्तू विकून जे पैसे येतील, त्याचा सदुपोग कॅन्सरग्रस्त लहान मुलांच्या मदतीसाठी करण्यात येईल. विशेषतः मिळणाऱ्या पैशांमधून या आजारी मुलांच्या खाद्यपदार्थांची व्यवस्था केली जाईल.

रणबीरचा फोटो देऊन आलियाने ही पोस्ट टाकली आहे. त्यात तिनं तो आपला वॉर्डरोब शेअर करून त्याचा विनियोग कॅन्सरग्रस्तांच्या पोषणासाठी करणार असल्याचं नमुद केलं आहे. या कामात कडल्स फाऊंडेशन त्यांची मदत करणार आहे.

आपल्याला आठवतच असेल की, रणबीरचे पिताजी ऋषी कपूर हे गेल्याच वर्षी कॅन्सरने वारले. त्यांच्यावर बरेच दिवस इलाज चालले होते. तरीपण ते वाचले नाहीत. तेव्हा आपल्या पिताजींना श्रद्धांजली अर्पण करणसाठीच बहुधा रणबीरने हे पाऊल उचलले असावे.

आलिया-रणबीरने समाजसेवा करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी रणबीरने काश्मीर आणि आसाम राज्यातील पिडितांच्या मदतीसाठी असाच धर्मादाय केला होता. त्यावेळी देखील रणबीरने आपले कपडे विकून आलेल्या पैशातून त्या लोकांना मदत केली होती. तर आलियाने देखील आपल्या वॉर्डरोबमधील कपडे विकून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेला मदत केली होती. याशिवाय आलियाने २०१७ साली प्राणी आणि इकॉलॉजी वेल्फेअर बाबत काम करणाऱ्या संस्थेला मदत केली होती. असो. आजच्या त्याच्या सेलबाबत अशी माहिती मिळाली आहे की, त्याचे चाहते कपडे खरेदी करण्यासाठी पुढे येत आहेत. याचा अर्थ आलियाच्या या मोहिमेस चांगलाच प्रतिसाद मिळणार आहे.