ऋषी कपूर यांच्या नावावरून ठेवणार आलिया भट्ट आणि...

ऋषी कपूर यांच्या नावावरून ठेवणार आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लेकीचे नाव (Alia Bhatt-Ranbir Kapoor’s Daughter’s Name Will Have A Special Connection With Grandfather Rishi Kapoor, Neetu Kapoor Gets Emotional, Deets Inside)

6 नोव्हेंबर 2022 रोजी आलिया भट्टने आपल्या मुलीला जन्म दिला, त्यानंतर रणबीर कपूर सोबतच संपूर्ण कपूर कुटुंब खूप भावूक झाले होते. मुलीच्या स्वागतासाठी बरीच तयारीही करण्यात आली होती. राज कपूरचे वडिलोपार्जित घर कृष्णा राजला पूर्णपणे सजवण्यात आले.

या तीन मजली आलिशान बंगल्यात कुटुंबातील सर्व सदस्यांसोबतच आलियाच्या लहान मुलीसाठी सुध्दा स्वतंत्र मजला ठेवण्यात आला आहे.दरम्यान, आलिया आणि रणबीरच्या या गोंडस चिमुकलीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतानाच या छोट्या परीच्या नावाबाबतही लोकांची उत्सुकता खूप वाढली आहे.

ज्या दिवसापासून बाळाचा जन्म झाला, त्या दिवसापासून चाहत्यांनी सोशल मीडियावर बाळाची नावे सुचवायला सुरुवात केली होती. आता बाळाच्या नावाशी संबंधित खास माहिती समोर येत आहे.आलिया आणि रणबीरला आई-वडिलांचे नाव जोडून मुलाचे नाव ठेवण्याचा ट्रेंड फॉलो करायचा नाही. त्यांना आजोबा ऋषी कपूरच्या नावावरून आपल्या लेकीचे नाव ठेवायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपूर कुटुंब आणि भट्ट कुटुंबाने मिळून मुलीचे नाव ठरवले आहे.

रणबीर आणि आलिया यांना आपल्या मुलीच्या या खास नावाद्वारे ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहायची आहे.

त्यांना त्यांच्या मुलीचे नाव आजोबा ऋषी कपूर यांच्या नावाशी जोडायचे आहे. मुलगा आणि सुनेचा हा निर्णय ऐकून नीतू कपूरही भावूक झाल्याचे म्हटले जाते.