EXCLUSIVE : १७ एप्रिल नाही, १५ एप्रिलला तेही मध...

EXCLUSIVE : १७ एप्रिल नाही, १५ एप्रिलला तेही मध्यरात्री रणबीर-आलिया घेतील सात फेरे, यामागे आहे खास कारण (Alia Bhatt-Ranbir Kapoor to marry on 15th April & it has very special connection)

बी टाऊनमधील सर्वात लोकप्रिय लव्ह बर्ड्स रणबीर-आलिया त्यांच्या लग्नाच्या बातम्या वाऱ्यासारख्या सगळीकडे पसरत आहेत. जेव्हापासून त्यांच्या लग्नाची बातमी आली आहे, तेव्हापासून रोज लग्नाच्या तारखेपासून ते लग्नाचे ठिकाण, पाहुण्यांची यादी आणि रिसेप्शनपर्यंत त्यांच्या लग्नाबाबत नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. आतापर्यंत रणबीर-आलिया १७ एप्रिलला लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या येत होत्या, पण आता आतील सूत्रांनी माहिती दिली आहे की, रणबीर-आलिया १७ एप्रिलला नाही तर १५ एप्रिलच्या मध्यरात्री अन्‌ १६ एप्रिलच्या पहाटे लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. ही तारीख लग्नासाठी निश्चित करण्यामागचे कारणही खूप रंजक आहे.

अद्याप यावर कपूर आणि भट्ट कुटुंबाकडनं कोणीच काही बोलत नाही आहे. त्यामुळे आतापर्यंत मीडिया रिपोर्टमध्ये लग्नाची तारीख १७ एप्रिल असल्याचेच सांगण्यात येत होते, परंतु आता विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे की, रणबीर-आलियाचे लग्न १६ एप्रिलच्या पहाटे २.०० ते ४.०० या वेळेत होणार आहे. येत्या १३ एप्रिलपासून पारपंरिक पंजाबी पद्धतीनं या दोघांच्या विवाहसोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि सर्व विधी १५ एप्रिलपर्यंत चालणार आहेत. कोणत्या दिवशी कोणते विधी केले जातील ते जाणून घेऊया.

* १३ एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे येथील आलियाच्या घरी मेंदी सेरेमनी होणार आहे.

* १४ एप्रिल रोजी आलियाच्या घरी हळदी-कुंकू आणि संगीताचे विधी पूर्ण होतील.

* १५ एप्रिलच्या रात्री सात फेरे घेऊन दोघे लग्न करणार. लग्नानंतर ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे

आलिया-रणबीरचं लग्न पहाटे लवकर होणार आहे. यामागचं कारण सांगताना असं म्हटलं जातंय की, दोघांच्या लग्नासाठी अंकशास्त्राला महत्त्व देण्यात आलं आहे. १६ एप्रिल, २०२२ ला जेव्हा आपण जोडतो तेव्हा रणबीर कपूरचा लकी नंबर ‘८’ तयार होतो. म्हणजे १६-४-२०२२ याची एकत्र बेरीज ८ येते. रणबीरसाठी नंबर ‘८’ हा लकी असल्यामुळे लग्न आता नंबर ‘८’ च्या कनेक्शनमुळे एक दिवस आधी होणार आहे. लग्नाआधी मेहेंदी ,संगीत असे सगळे सोहळे रीतसर पार पडणार आहेत.

आधी खरंतर बातमी होती की, हे दोघे परदेशात लग्न करणार आहेत. पण कपूर्स आपल्या कुटुंबाला खूप महत्व देतात. तसंच रणबीरच्या जनरेशनचं हे शेवटचं लग्न आहे. त्यामुळे त्यांना या लग्नात परंपरेचा मान राखत, पूर्वजांना सन्मान देत हे लग्न करायचं आहे. एवढे सोपस्कार करून लग्न ठरवलंय तर लकी नंबरने त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात चांगली होवो अशी सदीच्छा.