आलिया भट्टने दिली प्रेमाची जाहीर कबुली : म्हणते...
आलिया भट्टने दिली प्रेमाची जाहीर कबुली : म्हणते रणबीर हेच माझं जीवन आहे (Alia Bhatt Opens Up About The Love Of Her Life Ranbir Kapoor)

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय जोडी त्यांच्यातील नात्यामुळे कायम टॉक ऑफ द टाउन बनून राहते. सध्या ही दोघं जोधपूर येथे आहेत. ते दोघे त्यांच्या लग्नाच्या वेन्यूसाठी तेथे गेले असल्याचं म्हटलं जातं होतं. परंतु, खरं म्हणजे दोघं रणबीरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तेथे गेले होते, ज्याचे फोटो आपण सोशल मीडियावर पाहिले. बाकी लग्नासाठी वेन्यू पाहण्याच्या गोष्टीमध्ये कितपत तथ्य आहे माहीत नाही. परंतु आता जो फोटो व्हायरल होत आहे, तो आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
आलिया भट्टने रणबीर कपूरसोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला दिलेली कॅप्शन सगळ्यांचं मन वेधून घेणारी आहे. फोटोमध्ये रणबीर अन् आलिया समुद्रकिनारी पाठ करून बसून सूर्यास्ताच्या वेळचं नयनरम्य दृष्य न्याहाळत आहेत. आलियाने या फोटोवर लिहिलंय “हॅपी बर्थ डे माय लाइफ.” आलियाने या पोस्टमधून रणबीर हेच माझं जीवन असं जाहीरपणे सांगितलं आहे.

चाहते रणआलियाच्या या फोटोला प्रचंड पसंती दर्शवित आहेत. एका तासाभरात जवळपास १० लाखांहून अधिक लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आलियाने रणबीरसोबतचा फोटो पहिल्यांदाच टाकलेला नाही, याआधीही दोघांचे एकत्र फोटो चाहत्यांनी पाहिले आहेत, परंतु यावेळी लिहिलेला संदेश खास आहे आणि पहिल्यांदाच दिलेला आहे.
आलियाने रणबीरवरील प्रेमाची जाहिरपणे कबुली दिल्यानंतर आता त्यांचे लग्न होणार यात शंका उरली नाही. लवकरच दोघं लग्नबंधनात अडकतील.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
आलिया भट्टच्या कामाबद्दल सांगायचं तर ती ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘डार्लिंग्स’, ‘गंगूबाई काठियावाड़ी’, ‘तख्त’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर रणबीर कपूरचे ‘शमशेरा’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘ॲनिमल’ हे आगामी चित्रपट आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामध्ये रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.