आलिया भट्ट शूटिंग संपवून परतली मायदेशी, व्हायरल...

आलिया भट्ट शूटिंग संपवून परतली मायदेशी, व्हायरल होणाऱ्या फोटोत झळकत आहे गरोदरपणाचे तेज (Alia Bhatt is back in Mumbai, gives tight hug to husband Ranbir Kapoor, actress flaunts baby bump and Pregnancy glow)

आलिया भट्ट तिचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’चे शूटिंग पूर्ण करून भारतात परतली आहे. काल रात्री उशिरा ती मुंबई विमानतळावर आली. आलियाने काही दिवसांपूर्वीच ती गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर पहिल्यांदाच ती मीडियाच्या समोर आली.

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘हार्ट ऑफ स्टोन’च्या सेटवरील अनेक फोटो शेअर करून तिचे शूटिंग पूर्ण झाले असून आता घरी परतण्याची वेळ आली असल्याचे म्हटले होते. पोस्ट शेअर करताना तिने पती रणबीर कपूरला भेटण्याची उत्सुकताही व्यक्त केली होती आणि ‘मी घरी येत आहे बेबी (रणबीर कपूर )असे लिहले होते. काल आलिया मुंबई विमानतळावर बेबी बंपसह दिसली.

यावेळी तिने  पांढरा शर्ट आणि काळी पँट परिधान केलेली.  भारतात परतल्याचा आनंद यावेळी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ती विमानतळावर पोहोचताच पापाराझींनी आलियाला घेरले. त्यावेळी त्यांनी आलियाचे केवळ फोटो न काढता ती आई होणार असल्यामुळे तिचे अभिनंदनही केले. यादरम्यान पापाराझींनी तिला बाळाचे वडील कुठे आहेत असा प्रश्न केला त्यावर आलियाने काहीच उत्तर दिले नाही.

पण जशी ती आपल्या कारजवळ गेली तेव्हा कारमध्ये रणबीरला पाहून ती खूप खुश झाली. कदाचित रणबीरने आलियाला विमानतळावर येऊन सरप्राईज दिले असावे. रणबीरला पाहताच आलियाने त्याला मिठी मारली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते हा व्हिडिओ सतत शेअर करत आहेत. या कपलची ही स्टाईल त्यांच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

गरोदरपणाची बातमी समोर आल्यानंतर रणबीर आणि आलिया सतत चर्चेत होते. त्यांच्या विषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक होते. काही दिवसांनी ही जोडी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे प्रमोशन करताना एकत्र दिसणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होईल.