डार्लिंग चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला आलियाने लप...

डार्लिंग चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला आलियाने लपवला तिचा बेबी बंप, पिवळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती आलिया (Alia Bhatt Hides Baby Bump At ‘Darlings’ Trailer Launch, Actress Looks Drop-Dead Gorgeous In Yellow Short Dress, See Stunning Photos)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने जेव्हापासून तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर याबद्दल सतत चर्चा होताना दिसते. गरोदरपणाच्या घोषणेनंतर आलिया भट्टने पहिल्यांदाच ‘डार्लिंग्स’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या निमित्ताने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. आलिया भट्टने तिच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. यावेळी तिने तिचा बेबी बंप अतिशय स्टायलिश पद्धतीने लपवला.

आलिया भट्टचा आगामी डार्लिंग्स हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. या ट्रेलर लॉन्च वेळचे काही फोटो आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. आलिया तिच्या या नव्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

डार्लिंगच्या ट्रेलर लॉन्चवेळी ती लूज फिट पिवळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. ती नेहमीप्रमाणेच या लूकमध्ये सुद्धा खूप गोड दिसत होती. हे फोटो शेअर करताना आलियाने ”इट्स  डार्लिंग्स डे”असे कॅप्शन दिले आहे.

आलियाने मागील महिन्यातच तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. ट्रेलर लॉन्च दरम्यान, या चित्रपटाची इतर स्टार कास्ट शेफाली शाह आणि विजय वर्मा देखील उपस्थित होते.

अभिनेत्री नेहा धुपिया या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होती. त्यावेळी आलिया आणि नेहाची मस्ती पाहायला मिळाली.