राहाच्या जन्मानंतर आलिया भट्टमध्ये झाले आहेत हे...

राहाच्या जन्मानंतर आलिया भट्टमध्ये झाले आहेत हे बदल (Alia Bhatt has Changed a Lot After Birth of Daughter ‘Raha’, These Changes have Come in Actress)

बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री आलिया भट्टने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. सध्या आलिया आपल्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. आई झाल्यानंतर ती अनेकदा तिचे अनुभव तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे की मुलगी ‘राहा’च्या जन्मानंतर ती खूप बदलली आहे. यासोबतच अभिनेत्रीने आई झाल्यानंतर तिच्यात झालेल्या बदलांबद्दलही सांगितले आहे. जाणून घेऊया अभिनेत्रीमध्ये कोणते बदल झाले आहेत.

अलीकडेच आलिया भट्टने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले होते की- ‘मातृत्वाने मला खूप बदलले आहे. माझ्या मुलीच्या जन्मानंतर माझ्या शरीरात, माझे केस, माझे स्तन, माझी त्वचा, माझे प्राधान्य आणि माझी भीती यामध्ये अनेक बदल झाले आहेत.अभिनेत्री पुढे म्हणाली की, पण तुम्ही माझे मन पहा. माझे मन खूप मोठे झाले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले होते की, तिने सुरुवातीला तिच्या प्रेग्नेंसीची बातमी सर्वांपासून गुप्त ठेवली होती. पहिल्या 12 आठवड्यांपर्यंत आपल्या गर्भधारणेबद्दल कोणालाही सांगत नाहीत. म्हणूनच मी ही गोष्ट माझ्यापुरतीच मर्यादित ठेवली आणि कोणाला सांगितली नाही.

आलियाने असेही म्हटले होते की, माझ्या आयुष्यात काम नक्कीच महत्त्वाचे आहे, परंतु आता अशी एक वेळ आली जेव्हा माझे बाळ आणि आरोग्य मला कामापेक्षा जास्त महत्त्वाचे वाटू लागले. गर्भधारणेच्या वेळी मला शारीरिकरित्या कोणताही त्रास झाला नाही. सुरुवातीचे काही आठवडे माझ्यासाठी खूप कठीण होते, कारण तेव्हा मला खूप थकवा आणि मळमळल्यासारखे वाटायचे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे अफेअर 2018 मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाले होते. खूप काळ एकमेकांना डेट केल्यानंतर, 14 एप्रिल 2022 मध्ये या जोडप्याने लग्न केले आणि लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर, जून 2022 मध्ये, आलियाने आपल्या गरोदरपणाची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. नोव्हेंबरमध्ये आलियाने मुलगी ‘राहा’ला जन्म दिला.

लग्नाच्या 7 महिन्यांनंतरच आई झाल्यामुळे लोकांनी आलिया भट्टला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले. आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती, त्यामुळे लग्नाच्या 7 महिन्यांनंतरच तिने मुलीला जन्म दिला असे लोक म्हणू लागले. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत असतानाही आलिया आणि रणबीरने या मुद्द्यावर मौन बाळगणे योग्य मानले.

आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी आलिया भट्ट ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘RRR’, ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा’ आणि ‘डार्लिंग्स’मध्ये दिसली होती. याशिवाय आलिया लवकरच हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’ आणि करण जोहरच्या ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे.