गरोदरपणाच्या घोषणेनंतर आलिया भट्ट लंडनमध्ये पहि...

गरोदरपणाच्या घोषणेनंतर आलिया भट्ट लंडनमध्ये पहिल्यांदाच फोटोमध्ये दिसली (Alia Bhatt Glows in Her First Photos Post Pregnancy Announcement From London, Poses With Karan Johar And Manish Malhotra, See Viral Photos)

अभिनेत्री आलिया भट्टने दोन दिवसांपूर्वीच ती गरोदर असल्याची बातमी तिच्या चाहत्यांशी एक फोटो पोस्ट करुन शेअर केली.  या फोटोत आलिया हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपली आहे आणि रणबीर तिच्या शेजारी बसला आहे. ते दोघेही  अल्ट्रासाउंड मशीनकडे बघत आहे. त्या मशीनच्या मॉनिटरवर ह्रदयाचा इमोजी देण्यात आला आहे. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये आलियाने, ‘’आमचे बाळ…..लवकरच येत आहे’’, असे लिहिले आहे.

आलियाची ही पोस्ट अवघ्या काही मिनिटांतच तुफान व्हायरल झाली होती. आता पुन्हा एकदा आलियाचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून गरोदरपणाची घोषणा केल्यानंतरचा हा पहिलाच फोटो समोर आला आहे. या फोटोत आलियासोबत तिचे इंडस्ट्रीमधले काही जवळचे मित्रमंडळी आहेत.

आलिया सध्या लंडनमध्ये असून ती तिचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’ चे शूटिंग करत आहे. लंडनमध्ये आलियाने तिच्या इंडस्ट्रीतल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत रीयूनियन केले आहे. आलियाचे फोटो तिचा सगळ्यात जवळील मित्र मनीष मल्होत्राने सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोत करण जोहर सुद्धा आहे. फोटोत मनिष, आलिया आणि करण एकत्र पोज देत आहे. आलियाने पांढरा शर्ट, काळ्या रंगाचा चश्मा आणि सोनेरी रंगाचे कानातले घातले आहेत. तर मनीष आणि करणने जॅकेट घातले आहे.

दुसऱ्या एका फोटोत मनीष करीना कपूर खान आणि नताशा पूनावालासोबत फोटोसाठी पोज देत आहे. करीना सध्या तिच्या पती आणि मुलांसोबत लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तर गौरी खान आणि ट्विंकल खन्नासुद्धा लंडनला फिरायला गेल्या आहेत.