आलिया भट्टची उघड्या पाठीची चोळी बघून निंदकांनी ...

आलिया भट्टची उघड्या पाठीची चोळी बघून निंदकांनी तिची टर उडविली (Alia Bhatt Gets Trolled For Her Blouse Disaster At Anushka Ranjan – Aditya Seal’s Sangeet Ceremony)

‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ फेम अभिनेता आदित्य सील आणि अभिनेत्री अनुष्का रंजन यांच्या लग्नाचा भव्य सोहळा सुरू आहे. शनिवारी रात्री त्यांचा संगीत सोहळा झाला, या सोहळ्यात सर्वांच्या नजरा आलिया भट्टवर खिळल्या होत्या.

संगीताच्या संध्याकाळी, आलिया भट्ट हिरव्या रंगाचा सुंदर लेहेंगा घालून पोहोचली होती. यादरम्यान आलिया भट्टची उघड्या पाठीची चोळी सर्वात स्टायलिश होती. या संगीत सोहळ्यात नाचतानाचा आलियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आलिया ‘साथिया’ चित्रपटातील ‘छलका, छलका रे…’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी इन्स्टग्रामवर शेअर केला आहे.

यादरम्यान आलिया भट्ट तिची बेस्ट फ्रेंड आकांक्षा रंजनसोबत खूप मस्ती करताना दिसली. आकांक्षा ही अनुष्का रंजनची धाकटी बहीण आहे आणि आलियाची खूप चांगली मैत्रीण आहे. अनुष्का रंजन आणि आदित्य सील यांच्या संगीताच्या सोहळ्याला अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. अनुष्का आणि आदित्य हे एकमेकांना बऱ्याच काळपासून डेट करत होते.

सोशल मीडियावर आलियाचा हा व्हिडिओ आणि काही फोटोही प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमधे ती तिची टोन्ड कमर फ्लॉंट करताना दिसली. आलिया या फोटोंमध्ये सुंदर दिसतेय यात वादच नाही, तरीही बॅकलेस चोळीमुळे निंदकांकडून मात्र तिला ट्रोल केले जात आहे. निंदकांनी तिला अंतरंगी फॅशन करणाऱ्या उर्फी जावेदची नक्कल केल्याचे म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने पारंपरिक वस्त्रांना श्रद्धांजली असं म्हटलंय. तर दुसऱ्या एकाने म्हटलंय, आलिया हे काय घातलंय, फॅशनच्या नावाखाली काहीही… तर काही युजर्सना तिचा वेश युनिक वाटला त्यांनी तिची स्तुती केली आहे.

आलिया आणि रणबीर देखील २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकणार होते. मात्र त्यांनी काही कारणात्सव हे लग्न पुढे ढकलले आहे. आलिया-रणबीर हे येत्या डिसेंबरमध्ये लग्न करु शकतात, असे बोललं जात आहे. मात्र अद्याप त्यांच्या लग्नाबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आलिया आणि रणबीर दोघेही गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटींग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आलिया ही ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘RRR’, ‘डार्लिंग्स’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात व्यस्त आहे. यातील ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे शूटींग अद्याप बाकी आहे. तर रणबीर हा सध्या ‘शमशेरा’, ‘ऐनिमल’ या सारख्या चित्रपटात व्यस्त आहे.