आलिया झाली आहे सीता : वाढदिवसाला मिळाली खास गिफ...

आलिया झाली आहे सीता : वाढदिवसाला मिळाली खास गिफ्ट (Alia Bhatt Gets Special Birthday Gift, RRR Team Releases First Look Of Sita)

आलिया भट्टला आज, तिच्या वाढदिवशी ‘आर आर आर’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूकची गिफ्ट मिळाली आहे. या चित्रपटात आलिया झाली आहे रामाची सीता!
आलियाने स्वतः इन्स्टाग्रामवर हे लूक शेअर केले आहे. आलियाचा हा फोटो फटाफट व्हायरल झाला आणि लोक म्हणताहेत – फिल्म सुपरहिट होईल. एस. राजामौली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्यांनी बाहुबलीचे दिग्दर्शन केले होते. यामध्ये आलिया सोबत ज्युनिअर एन. टी. आर., रामचरण आणि अजय देवगण यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘आर आर आर’ या चित्रपटाबद्दल बोलायचं तर अलुरी सीताराम राजू आणि कोमारम भीम या दोन स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर तो आधारित आहे. या दोघांनी इंग्रज तसेच हैदराबाद येथील निझामाच्या विरूद्ध स्वातंत्र्य संग्राम केला होता. हा चित्रपट ३१ ऑक्टोबरला प्रदर्शित करण्याची तयारी सुरू असून तो १० भाषेत निघणार आहे.
आलियाने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत हार्टवाला इमोजी पण टाकला आहे. त्यामध्ये ती किती शालीन आणि सुंदर दिसते आहे, ते तुम्ही बघाच.

‘आर आर आर’ मुव्हीने ट्‌विटरवर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करून लिहिलं की, मिलिए हमारी सीता से!

यामधील आलियाच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर ती हिरव्या साडीत, दाक्षिणात्य रूपात दिसते आहे. तिच्या आजूबाजूला दिवे प्रज्वलित करण्यात आले आहेत. शिवाय ती रामाच्या मूर्तीसमोर बसली आहे.

सदर पोस्टर पाहता, असे दिसून येते की, या चित्रपटाला चांगली कमाई होणार आहे. आलियाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

Photo Courtesy: Instagram