आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी साजरी केली लग्न...

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी साजरी केली लग्नाची फस्ट मंथ ॲनिव्हर्सरी, शेअर केले अनसीन फोटो (Alia Bhatt Celebrated 1 Month Wedding Anniversary With Hubby Ranbir Kapoor, Shares Unseen Photos)

जवळपास पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर, बॉलीवूडचे लव्हबर्ड्स आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी अखेर १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. बघता बघता दोघांच्या लग्नाला एक महिना उलटून गेला आहे. दोघांनी हा आनंदाचा सोहळा एकत्र साजरा केला. बॉलिवूड स्टार आलिया भट्टने तिच्या लग्नाच्या एक महिन्याच्या वाढदिवसानिमित्त पती रणबीर कपूरसोबतचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Alia Bhatt

https://www.instagram.com/p/Cdh3Mqps6s8/?utm_source=ig_web_button_share_sheet

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर, बॉलिवूडमधील सर्वात क्युट जोडप्यांपैकी एक असून, एक महिन्यापूर्वी १४ एप्रिल रोजी जवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. एका महिन्यानंतर, १४ मे रोजी, बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या पहिल्या महिन्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

Alia Bhatt
Alia Bhatt

यावेळी आलिया भट्टने पती रणबीर कपूरसोबतचे लग्नातील काही न पाहिलेले फोटो पोस्ट केले आहेत. या सुंदर छायाचित्रांमध्ये लव्हबर्डच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत आहे. या फोटोंमध्ये दोघंही हसताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनसह फुगे, डान्स आणि केकचे इमोजी बनवले आहेत.

Alia Bhatt

आलियाने तिच्या लग्नानंतरच्या सेलिब्रेशनचा फोटो काढला आहे. त्यात ते एकमेकांकडे प्रेमाने पाहताहेत.

Alia Bhatt

या जोडप्याच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या दुसऱ्या फोटोमध्ये रणबीर कपूर आलियाला मिठी मारताना दिसत आहे. आणि तिसऱ्या आणि शेवटच्या फोटोमध्ये हे जोडपे हसताना दिसत आहे. आलिया भट्टने तिच्या लग्नाच्या अल्बममधून पती रणबीर कपूरसोबतचे हे सुंदर फोटो निवडून काढले आहेत. या फोटोंमध्ये हे उभयता हस्तिदंती आणि सोनेरी रंगाच्या पोशाखात दिसत आहे. पाच वर्षांपासूनचं प्रेम त्यांच्या फोटोंतूनही आपणांस कळून येत आहे.